Demat Account : जर तुम्ही म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करत असाल तर तुमचे डिमॅट खाते आवश्यक असेल. कारण की वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग करण्यासाठी व शेअर मार्केटचे अपडेट अपडेट ठेवून जर तुम्हाला एखाद्या शेअर्स विकत घ्यायचा असेल, शेअरची विक्री करायची असेल तर आपल्याला एका अकाउंटची गरज असते.
मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट आपल्याला पाहायला मिळतात त्यातील एक अकाउंट म्हणजे डिमॅट अकाउंट. या अकाउंट च्या माध्यमातून आपण व्यवहार करू शकतो परंतु जर एकापेक्षा जास्त डिमॅट अकाउंट असतील तर अशावेळी काय करायचं? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.
एका सर्वेक्षणानुसार गेल्या काही महिन्यात डीमॅट खात्यांची संख्या 11 कोटीच्या पुढे गेली आहे. अनेक लोक एकापेक्षा अधिक डिमॅट खाते वापरत आहेत आणि या वेगवेगळ्या डिमॅट खात्यांच्या माध्यमातूनच शेअर देखील खरेदी केले जात आहे, असे चित्र दिसून आले.
तुम्हा सर्वांना माहितीच आहे की, हल्ली प्रत्येक जण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक दिसत आहे. यामुळे डिमॅट खाते उघडणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली आहे. या सर्वांनी कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या सर्वांचा लाभ घेतलेल्या पाहायला मिळतो. अनेकजण शेअर मार्केटकडे वळले. या सर्वांमुळे डिमॅट खात्यांची संख्या देखील वाढलेली आहे. अनेक जण एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे देखील ट्रान्सफर करत असतात.
खात्यांची संख्या वाढण्यामागील कारण देखील वेगवेगळ्या आहेत. अनेकदा लोकांना खाते कसे ओपन करायचे याबद्दल माहिती नसते किंवा अनेक जण ब्रोकरेज मुळे देखील खाते उघडण्यासाठी लोक असे करतात. तुम्हाला वेगवेगळ्या डिमॅट खात्यामध्ये जे शेअर पडलेले असतात ते एका ठिकाणी देखील जमा करता येतात.
Demat Account सहज करा ट्रान्सफर शेअर
जर तुमचे दोन खाते असतील तर अशावेळी तुम्ही एकाच ठिकाणी तुमचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. एकाच ठिकाणी शेअर खरेदी किंवा विकू देखील शकतात. पुढच्या वेळी दोन दोन अकाउंट ठेवण्यापेक्षा एकाच खात्याच्या मदतीने व्यवहार करू शकतात. एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याचे काम तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करू शकतात. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धती चा वापर हमखास करू शकतात.
ऑनलाईन पद्धतीचा करा असा वापर
जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीचा वापर करायचा असेल तर अशावेळी तुमच्या अपडेटेड ब्रोकरकडून डीआयएस म्हणजे डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप घ्या त्यानंतर ही स्लिप भरल्यानंतर लोकर कडे जमा करा ब्रोकर भरलेला फॉर्म डिपॉझिटरी ला देईल आणि डिपॉझिटरी तुमचे नवीन शेअर नवीन खात्यामध्ये ट्रान्सफर करेल.
डिपॉझिटरी द्वारे शेअर ट्रान्सफर होताच तुमचे सगळे शेअर नवीन खात्यामध्ये किंवा दोघांपैकी एका खात्यामध्ये दिसू लागतील.ही प्रक्रिया पार पडताच तुमचे जुने डिमॅट खाते बंद होईल आणि सर्व व्यवहार नवीन खात्याच्या माध्यमातूनच होतील, अशावेळी तुम्हाला दोन दोन खाते हँडल करावे लागणार नाही. एकाच खात्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पैशांचे व्यवहार करू शकतात.
जर तुम्ही तुमचे जुने खाते बंद केले नसेल तर अशावेळी तुम्हाला शुल्क देखील आकारावे लागू शकते. हे खाते हे ऑनलाईन पद्धतीने बंद केले जात नाही, त्याकरिता तुम्हाला खूप जवळच्या शाखेमध्ये जाऊन फॉर्म भरणे गरजेचे आहे त्यानंतर तुमचे खाते बंद होऊ शकते.