Tax on Gifted Stocks : शेअर गिफ्ट म्हणून दिले तर त्यावर किती कर लागतो आणि शेअर्स कसे गिफ्ट द्याल

Tax on Gifted Stocks : तुम्हीं शेअर मार्केट मधील शेअर गिफ्ट म्हणून आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना देत आहात तर आजच सावध व्हा आणि जाणून घ्या गिफ्ट म्हणून शेअर मार्केट तील स्टॉक शेरींग वरती कोणकोणते कर लागतात आणि सरकारने गिफ्ट म्हणून शेअर मार्केट तील स्टॉक शेरींग वरती कोणकोणते नवीन नियम लागू केले आहेत.

आजकाल लोकांचा शेअर मार्केट कडे कल खूप वाढला आहे ,लोक बाकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. शेअर मार्केट मधे मिळत असणाऱ्या जास्त रिटर्न यामुळे आजकाल लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत आहेत.पूर्वी लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रांना गिफ्ट देत होते.

काही लोक सोने चांदी गिफ्ट म्हणून देत होते ,तर काही लोक नवीन कपडे किंवा भेटवस्तू गिफ्ट म्हणून देत होते.परंतु बदलत्या वेळे बरोबर गिफ्ट देण्याचे साधन देखील बदलेले आहे.

आजकाल भरपूर लोक शेअर मार्केट तील listed किंवा unlisted शेअर चे गिफ्ट एकमेकांना द्यायला लागले आहेत.अशाच वेळी वाढत्या या शेअर मार्केट मधील गिफ्ट देण्याच्या प्रमानासोबत आपल्याला गिफ्ट म्हणून शेअर मार्केट तील स्टॉक शेरींग वरती सरकारने कोणकोणते नवीन नियम लागू केले आहेत,तसेच नवीन कर याची माहिती असणे गरजेचे आहे.

आपण या लेखामध्ये गिफ्ट म्हणून शेअर मार्केट तील स्टॉक शेरींग वरती बदललेल्या करातील नवीन नियमा बद्दल माहिती पाहणार आहोत.

50,000 पर्यंतचा कोणत्याही Tax on Gifted Stocks लागू होणार नाही

आयकर विभागाच्या मते एका आर्थिक वर्षामध्ये ५०,००० पर्यंतचा गिफ्ट वरती कोणताही कर लागणार नाही. म्हणजे तुम्ही कोणालाही ५०,००० रुपयच्या आतपर्यंत गिफ्ट देऊ शकता,ते ही वीणा कर देता.जर तुम्ही ५०,००० रुपये पेक्षा जास्त रुपयांचे गिफ्ट आपल्या मित्रांना किंवा कुटुंबियातील सदस्यांना दिले तर त्यावरती कर लागेल आणि हा कर ज्या कुणाला गिफ्ट म्हणून आपण देत आहोत,त्या व्यक्तिला भरावा लागेल.ह्या गिफ्ट शेअर करतानाच्या करामध्ये शेअर मार्केट मधील स्टॉक,गाडी,सोने चांदीचे दागिने,इत्यादी यांचा समावेश असू शकतो.

खालील लोकांसाठी Tax on Gifted Stocks देणे आहे कर फ्री

गिफ्ट वरती कर लागणे हे या गोष्टी वरती ही आधारित आहे की,कोण कोणाला गिफ्ट देत आहे.आयकर विभागाच्या मते रेलेटिव मध्ये दिलेल्या गिफ्ट वरती कोणताही कर लागत नाही , म्हणजे रीलेटिव मध्ये कोणी कितीही रूपये पर्यंतचे गिफ्ट दिले तर त्यावर कोणताही कर लागत नाही.आता या रीलेटिव मध्ये कोण कोण येते हे पाहूया ?

बायको आपल्या नवऱ्याला किंवा नवरा आपल्या बायकोला कितीही किंमती पर्यंतचे गिफ्ट देऊ शकतो,ते ही एक्स्ट्रा कर न भरता.तसेच बायको सोबत नवरा आपल्या रक्तातील आई- बाबा , भाऊ ,बहीण यांना वीणा करचे कितीही रुपये पर्यंतचे गिफ्ट देऊ शकतो.

याचबरोबर बायको देखील तिच्या रक्तातील आई वडिलांना, भाऊ,बहिणीला वीणा कराचे कितीही रुपये पर्यंतचे गिफ्ट देऊ शकतो.जर आपल्या बापाला आपल्या मुलाला आपली जमीन गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर तो बाप आपल्या मुलाला वीणा कर देता गिफ्ट म्हणून आपली जमीन देऊ शकतो.

कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला गिफ्ट देताना कर द्यावा लागतो?

तुम्ही तुमच्या रीलेटीव ना वीणा कर देता गिफ्ट देऊ शकता.परंतु काही केसेस मध्ये कर द्यावा लागतो.जसे की समजा ,तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे समजा बायकोला शेअर मार्केट मधील एखादा स्टॉक गिफ्ट म्हणुन दिला आणि तुमच्या बायकोने तो स्टॉक विकला किंवा divident विकला तर त्यावेळी तुमच्या बायकोला आयकर धारा ६४ च्या अंतर्गत सरकारला कर द्यावा लागेल.

खालील पद्धतीने कर केवढा द्यावा लागेल याचे calculation आपण करू शकता:

कर होल्डींग पिरेड च्या हिशोबाने लागतो.जर एखादा शेअर मार्केट मधील लिस्टेड शेअर खरेदी केल्यानंतर एका वर्षाच्या आत विकला तर त्यावरती जेवढे पैसे रिटर्न मिळाले आहेत त्यातील १५% कर सरकारला द्यावा लागेल.जर तोच शेअर मार्केट मधील लिस्तेड शेअर खरेदी केल्यानंतर एका वर्षा नंतर विकला तर १०% एवढा कर सरकारला द्यावा लागतो.

याउलट जर शेअर मार्केट मधील अन् लिस्टेड शेअर खरेदी केल्याचा ३४ महिने आधी विकला तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात आणि जर शेअर मार्केट मधील अन् लिस्टेड शेअर खरेदी केल्याचा ३४ महिने नंतर विकला तर त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणतात.
शॉर्ट टर्म गेन मध्ये स्लॅब टेस्ट च्या हिशोबाने कर लागू होतो, तर लंग टर्म गेन मध्ये २०% कर सरकारला द्यावा लागतो.

Leave a Comment