Social security scheme : एसबीआई (स्टेट बँक ऑफ इंडिया) ही भारतातील सर्वात मोठ्या बँक पैकी एक बँक आहे आणि नियमित एसबीआई आपल्या खातेदारांसाठी नवनवीन योजना लागू करत असते,जेणेकरून एसबीआई च्या खातेदारांना त्या योजनेचा लाभ होईल.एसबीआई (स्टेट bank ऑफ इंडिया) मध्ये भारतातील खूप नागरिकांनी आपले खाते उघडले आहे .
अन ते खातेदार एसबीआई च्या योजनांचा लाभ घेत आहेत.तसेच एसबीआई मध्ये नवीन खाते उघडनाऱ्यांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे.एसबीआई (स्टेट bank ऑफ इंडिया) च्या अशाच एका योजनेबद्दल म्हणजे सामाजिक सुरक्षा योजनेबद्दल (Social security scheme) माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेदारांना विशेष सुविधा मिळावी यासाठी सतत प्रयत्न करत असते.एसबीआई कडून अशी माहिती मिळते की फक्त आधार कार्ड वरून खातेदार सामाजिक सुरक्षा योजने (Social security scheme) चे खाते उघडू शकतो.
पूर्वी सामाजिक सुरक्षा योजनेचे (Social security scheme) खाते उघडण्यासाठी खातेदारांना बँक पासबुक ची आवश्यकता लागत होती,विना पासबुक माहिती देता ते सामाजिक सुरक्षा योजना (Social security scheme) चे खाते उघडू शकत नव्हते.परंतु एसबीआई बँकेत खाते असणारे खातेदार बँक पासबुक न देता, फक्त आधार कार्ड वरती सामाजिक सुरक्षा योजने चे खाते उघडू शकतो.
सामाजिक सुरक्षा योजना विषयी
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहक सेवा केंद्र (CSP) वरती जाणाऱ्या ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजना चे खाते उघडण्यासाठी फक्त आधार कार्ड डिटेल टाकावे लागेल.
पहिल्या मानाने एसबीआई ने सामजिक सुरक्षा योजने चे खाते उघडण्याची प्रोसेस फास्ट केली आहे,जेणेकरून ग्राहक कमी वेळात एसबीआई च्या सामाजिक सुरक्षा योजने (Social security scheme) मध्ये खाते उघडण्यासाठी निवेदन करू शकतील.
ग्राहक सेवा केंद्र द्वारे ग्राहकांना एसबीआई तील transaction ची सुविधा त्वरीत होते.तुम्ही केवळ आधार कार्ड च्या साहाय्याने सामजिक सुरक्षा योजना सोबत बाकीच्या इतर योजनेचा लाभ घेऊ शकता.
एसबीआई (स्टेट bank ऑफ इंडिया) बँकेचे चेअरमन असणारे दिनेश खरा यांचे मत आहे की,” आर्थिक सुरक्षा मध्ये अडचण आणणाऱ्या गोष्टींचे त्वरीत निवारण करणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे.ज्या व्यक्तींना सामजिक सुरक्षेची सर्वात जास्त गरज असेल अशा व्यक्तींना त्याचा फायदा होईल.
सामजिक सुरक्षा योजना (Social security scheme) कोणकोणत्या आहेत ?
सामाजिक सुरक्षा योजना खालीलप्रमाणे आहेतः
- अटल पेन्शन योजना (Atal pension Yojana)
- प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
- प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)
प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही भारत सरकारची योजना ही विमा योजना आहे. प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजने मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ५० च्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
व्यक्तीचे वय जर १८ च्या आत असेल किंवा ५० च्या वरती असेल तर तो व्यक्ती प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे खाते उघडू शकत नाही.
PM जीवन ज्योती विमा योजनेमध्ये आपण दोन लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतो. ज्यामध्ये आपले वार्षिक ४३६ रुपये इतके प्रीमियम असते.
जर तुम्ही खूप बिझी असाल आणि तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही ऑटो डेबिट ही सुविधा चालू करू शकता.जेणेकरून ज्या दिवशी प्रीमियम चे देय द्यायचे आहे, अशा दिवशी प्रीमियम ची रक्कम तुमच्या बँक खात्यामधून ऑटो डेबिट होईल.असे जर तुम्ही केले तर तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही आणि तुमचा वेळ वाचेल.