SIP Investment : जीवनामध्ये आर्थिक संकट निर्माण होऊ नये किंवा आर्थिक बळकटी निर्माण व्हावे याकरिता अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करत असतात परंतु आपल्या मेहनतीने कमावलेला पैसा हा योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे देखील गरजेचे आहे. अनेकदा आपण मेहनतीने कमावलेला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत असतो.
परंतु त्या ठिकाणाहून योग्य ते व्याजदर आपल्याला मिळत नाही व हे पैसे मध्येच देखील काढता येत नाही कारण की गुंतवणूक करत असताना काही वर्षाचा लॉक इन पिरेड असतो. अशावेळी आपले पैसे असुरक्षित राहत नाही.
जर तुम्ही देखील पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना पैसे कसे गुंतवणूक करायचे त्याबद्दल…
आपल्यापैकी अनेकांनी एस आय पी हे नाव ऐकले असेल. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हल्ली प्रत्येक जण एस आय पी मध्ये पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो. एस आय पी मध्ये आपण ठराविक रक्कम ठराविक महिन्यांसाठी गुंतवणूक करत असतो.
या एसआयपी मध्ये पैसे गुंतवणूक केल्याने आपल्याला रिटर्न देखील चांगले मिळत असतात, अशावेळी गुंतवणूक किती करायची व कशाप्रकारे करायची याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे.
लक्ष ठरवा
जर तुम्हाला येथे मध्ये ठराविक रक्कम गुंतवणूक करायची असेल तर याआधी तुमचे लक्ष ठरवणे गरजेचे आहे. तुम्ही घर, रिटायरमेंट आणि मुलाच्या शिक्षणासाठी किती बचत करणार आहात? तुमचे ध्येय उद्दिष्ट नेमके काय आहेत? तुम्हाला तुमची गुंतवणूक किती वर्षापर्यंत करायची आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी शांत डोक्याने विचार करूनच घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा पैसा कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करायचा आहे आणि म्हणूनच आधी आपल्याला लक्ष ठरवायचे आहे.
रिस आणि रिटर्न किती मिळणार हे तपासणे
कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये पैसा गुंतवणूक करत असताना रिस्क किती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर तुम्ही एक विशिष्ट वर्षांमध्ये गुंतवलेला पैसा त्या पैशांवर व्याजदर किती मिळणार आहे.
हे जर आधीच तपासून घेतले तर तुमचा पैसा सुरक्षित राहील. जास्त आर्थिक संकट देखील तुम्हाला येणार नाही विशिष्ट वर्षानंतर व्याजदर चांगला देखील मिळेल परंतु हे सर्व आधी तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे.
गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडा
जर तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आधी योग्य म्युच्युअल फंड निवडायला हवा. ज्यामुळे तुमची रिक्स आणि तुमचे ध्येय देखील गाठण्यासाठी मदत होईल.
जोखीम करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इक्विटी फंड मध्ये पैसा गुंतवणूक करू शकता तसेच म्युच्युअल फंडांचे वेगवेगळे प्रकार जाणून घेऊन तुम्ही तुमच्या बचतीनुसार आवश्यक तो पण निवडू शकता.
म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रीड फंड असे प्रकार पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एखाद्या फंड निवडू शकता.
योजनेत पैसा गुंतवणूक करण्याआधी योजना जाणून घ्या
आपण नेमक्या कोणत्या योजनेमध्ये पैसा गुंतवणूक करत आहोत त्या योजनेची किंवा म्युच्युअल फंड ची मागील कामगिरी तपासायला हवे. गेल्या अनेक दिवसांपासून हा फंड मार्केटमध्ये कसा आहे.
या फंड बद्दल चढ-उतार होत आहेत का तसेच गुंतवणूक केलेला पैसा व ग्राहकांना मिळालेल्या लाभ याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. योग्य विश्लेषण करूनच पैसे गुंतवणूक करा.
सुरुवात लहान गुंतवणुकीद्वारे करा
जर तुम्हाला तुम्ही बचत केलेला पैसा कुठेतरी गुंतवणूक करायचा असेल तर दर महिन्याला ठराविक रक्कम म्हणजेच छोटी लहान रक्कम गुंतवणूक करा. तुमचे उत्पन्न वाढत जाईल त्या पद्धतीने तुमची एस आय पी रक्कम मध्ये देखील वाढ करा असे केल्याने तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट येणार नाही.
दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा
एसआयपी हे लॉन्ग टर्म साठी चांगले ठरते. जर तुम्ही लॉंग फॉर्म साठी पैसा गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला रिटर्न देखील तितकेच मिळते तसेच चक्रवाढ दर देखील चांगला मिळून येतो आणि त्याचे फायदे देखील आहेत.
गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय यांचा विचार करा
जर तुम्हाला तुमचा पैसा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायचा असेल तर त्याकरिता वेगवेगळे पर्याय नेमके कोणकोणते आहेत. योग्य एसआयपी चे पोर्टफोलिओ मॅक्झिन या सर्वांचे अवलोकन करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या माध्यमातून एखाद्या फंड बद्दल जास्त माहिती घ्या आणि आपल्यासाठी कोणता पर्याय चांगला आहे त्यानुसारच पैसे गुंतवा.
तज्ञांचे मार्गदर्शन घ्या
जर तुम्ही पहिल्यांदाच एसआयपी मध्ये पैसे गुंतवणूक करायला असाल तर अशावेळी आर्थिक तज्ञ यांचे मार्गदर्शन आवश्यक घ्या. हे तुमचे आर्थिक ध्येय उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करते.
या सर्वांमुळे पैसा वाढणार आहे तसेच तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट येणार नाही, अशा प्रकारे जर तुम्ही पहिल्यांदाच एसआयपी मध्ये पैसा गुंतवणूक करणार असाल तर वरील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार जरूर करा.