Scheme For Retirement : जो कोणी नोकरी करतो त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता होत असते.प्रतेकाला वाटते आपले निवृती नंतरचे आयुष्य चिंता मुक्त आणि आनंदी असावे.आपल्याला जर आपले निवृती नंतरचे आयुष्य आनंदी आणि चिंता मुक्त जगायचे असेल.
तर वाट न बघता आजच सरकारच्या या योजमधे पैसे गुंतवून मिळवा निवृत्तीनंतर म्हंजे वयाच्या ६० नंतर दर महाला ५००० इतके रुपये.जर तुम्ही पण तुमच्या निवृत्ती नंतरच्या आयुष्यात आनंदी राहू इच्छिता ,जर तुम्हाला ही तुमचे निवृती नंतरचे आयुष्य आंनदा मध्ये जगायचे असेल,तर तुम्ही ह्या सरकारच्या पेन्शन योजनेमध्ये आतापासूनच गुंतवणूक करायला चालू करा.
तुम्ही दरमहिण्याला फक्त २१० रुपये इतकी गुंतवणूक करून निवृती नंतर म्हंजे वयाच्या ६० नंतर दर महिन्याला ५००० रुपये इतकी पेन्शन मिळवू शकता.मुख्य गोष्ट ही आहे की,ह्या पेन्शन योजनेची हमी सरकार स्वतः देते.
कमी गुंतवणुकीमध्ये सामान्य लोकांना जास्त पेन्शन मिळावी या उद्देशाने सरकारने वर्ष २०१५-१६ मधे “अटल पेन्शन योजना (API)” या योजनेची सुरवात केली.महत्वाचे म्हंजे जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे,तेव्हापासून आतापर्यंत ५ करोड पेक्षा जास्त भारतीयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि या योजने मध्ये आपले पैसे गुंवतले आहेत.
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला इतके पैसे गुंतवावे लागणार ?
Scheme For Retirement जर तुमचे वय १८ आहे आणि तुम्ही या “अटल पेन्शन योजनेमध्ये” पैसे गुंतवू इच्छिता तर तुम्हाला महिन्याला २१० रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल आणि वयाच्या ६० नंतर तुम्हाला दर महिन्याला ५,००० इतकी रक्कम मिळेल.ही पेन्शन देण्याची हमी सरकार देते,त्यामुळे तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही.
जर तुमच्यासाठी महिन्याला २१० रुपये इतकी गुंतवणूक जास्त वाटत असेल तर तुम्ही दर महिन्याला ४२ रुपये गुंतवून ६० वर्षानंतर १००० रुपये इतकी पेन्शन दर महिन्याला मिळवू शकता याव्यतिरिक्त जर तुम्ही ८४ रुपये इतकी गुंतवणूक जर दर महिन्याला केली, तर तुम्हाला निवृत्तीनंतर म्हणजे ६० वर्षा नंतर २००० रुपये इतकी पेन्शन दर महिन्याला मिळणार,जर तुम्ही महिन्याला १२६ रुपये इतकी गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर दर महिन्याला तुम्हाला ४००० रुपये इतकी पेन्शन मिळणार.
या योजनेमध्ये (Scheme For Retirement) जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक करणार तेवढ्या लवकर तुम्हाला या योजनेचा लाभ उचलता येणार. या योजनेमध्ये गुंतवायचे रक्कम तुम्ही तुमच्या कमाई नुसार किंवा इच्छेनुसार कमी-जास्त करू शकता.
सरकार अटल पेन्शन योजना अंतर्गत लोकांना १००० पासून ५००० पर्यंत पेन्शन दर महिन्याला देत आहे.जर एका व्यक्तीने या अटल पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक केली तर त्याला मरेपर्यंत सरकार १००० ते ५००० इतकी पेन्शन देणार.जर या योजनेत गुंतवणूक केली व्यक्तीचा मृत्यू वयाच्या ६० च्या आधी झाला तर या योजमधील रक्कम त्या मुर्त्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना मिळणार.
कमी वया मधे करा गुंतवणूक
तुम्ही तुमच्या कमाई नुसार दर महिन्याला पैसे गुंतवून तुमच्या निवृत्तीनंतर च्या आयुष्यात या योजने अंतर्गत १००० पासून ते ५००० पर्यंत दर महिन्याला मिळवू शकता. या योजनेमध्ये तुम्ही वयाच्या १८ वर्षापासून ते ४० वर्षापर्यंत गुंतवणूक करणे चालू करू शकता.
या अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची संख्या ५ करोड इतकी आहे आणि ही गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.तुम्हीही या ५ करोड लोकांसारखे या “अटल पेन्शन योजनेमध्ये” गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजनेचा लाभ कोण – कोण घेऊ शकत
सरकारने या योजनेमध्ये कोणती कोणती व्यक्ती गुंतवणूक करू शकते यासाठी काही नियम बनवले आहेत आणि काही जुन्या नियमा मध्ये बद्दल देखील केले आहेर.या नियमा मध्ये जे कोणी बसत नाही त्यांना या “अटल पेन्शन योजनेचा” लाभ घेता येणार नाही.
जर १ ऑक्टोबर २०२२ पासून कोणताही नागरिक टॅक्स पेयर असेल,तर तो व्यक्ती या “अटल पेन्शन योजनेचा” लाभ घेऊ शकत नाही.जर “अटल पेन्शन योजनेमध्ये” गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर या योजनेचा लाभ त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीने ज्याला कोणाला त्या योजनेचा वारस केले आहे त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होतील.