SBI Salary Account : आपल्या पैकी खूप जण नोकरी करतात .महिन्याला येणारा आपला पगार ज्या बँक खात्यात जमा होतो त्या बँक खात्याला सैलरी खाते म्हणले जाते.प्रत्येक बँकेचे वेगळे सैलरी खाते असते.असेच एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) चे देखील वेगळे सैलरी खाते आहे.
आपण आजच्या लेखामध्ये एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या सैलरी खात्याबद्दल आणि एसबियाई च्या सैलरी खाते उघडल्या मुळे आपल्याला होणाऱ्या फायद्या बद्दल, विशेष सुविधा बद्दल माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
चला तर मग लेखाला सुरवात करूयात.एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) ही देशातील सर्वात मोठी बँक मानली जाते.आणि एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) खात्यान खूप भारतीयांची विशिष्ट खाती आहेत.
खूप लोकांना सैलरी खाते आणि सेविंग खाते हे एकच आहेत असे वाटते,परंतु असे नाहीये, सैलरी आणि सेवींग खाते हे दोन्ही वेगवेगळे खात्यांचे प्रकार आहेत. सैलरी खात्यांमध्ये ग्राहकाला खूप गोष्टींचा लाभ होतो.
एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) देशातील सरकार, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच इतर लोकांना देखील एसबियाई चे salary खाते उघडण्याची संधी देते.तुम्ही देखील एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) चे सैलरी खाते काढू इच्छित असाल तर तुम्हाला सैलरी खात्याच्या विशेष सुविधा बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.
SBI Salary Account मदतीने देत असलेल्या काही विशेष सुविधा खालीलप्रमाणे :
- एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या सैलरी खात्यामध्ये तूम्हाला झीरो balance खात्याची सुविधा मिळते.तुम्ही एसबियाई बँकेमध्ये झीरो कहते balance मध्ये सैलरी खाते उघडू शकता.
- एसबियाई च्या सैलरी खात्यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मासिक शुल्क द्यावे लागत नाही.तुम्ही वीणा मासिक शुल्क देता एसबियाई च्या सैलरी खात्यातील विशेष सुविधांचा लाभ घेऊ शकता.
- एसबियाई च्या सैलरी खात्यामध्ये तूम्हाला ऑटो स्वीप ची सुविधा मिळते.
- एसबियाई च्या सैलरी खात्याच्या मार्फत तुम्ही ATM द्वारे कधीही आणि केव्हाही transaction करू शकता.
- एसबियाई च्या सैलरी खात्यामुळे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट करण्यामध्ये सुट मिळते.
- एसबियाई salary खात्या मार्फत सैलरी खाते उघडलेल्या ग्राहकांना अपघात विमाचा,तसेच इतर विमांचा लाभ होतो.
- एसबियाई सैलरी खात्या मार्फत एसबियाई बँक ग्राहकांना पर्सनल लोन,होम लोन , कार लोन यावरती सूट देते.
- एसबियाई सैलरी खात्या मार्फत ग्राहकांना बँकेमध्ये वार्षिक लॉकर घेण्यामध्ये देखील सूट मिळते.
- ओवर ड्राफ्ट ची सुविधा ग्राहकाच्या सैलरी खात्यामध्ये येणाऱ्या सैलरी वरून ठरवली जाते आणि ग्राहकाला त्याचा फायदा होतो.तुमची सैलरी जास्त असेल तर तुम्हाला ओवर ड्राफ्ट मधील सुविधांचा लाभ होणार,तसेच जर तुमची सैलरी कमी असेल तर तुम्हाला ओवर ड्राफ्ट चा लाभ कमी प्रमाणात होणार.
एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) मधे सैलरी खाते उघडण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट ची आवश्यकता असते ?
SBI Salary Account उघडण्यासाठी खालील डॉक्युमेंट ची आवश्यकता लागते
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पैन कार्ड (PAN Card)
- पासपोर्ट साइज फोटो (2 फोटो)
- सैलरी स्लिप (Salary Slip)
- अड्रेस प्रुफ साठी लाईट बिल,पाण्याचे बिल
- जर तुम्हाला एसबीआई चे जॉइंट खाते उघडायचे असेल तर तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत जॉइंट खाते उघडायचे आहे त्या व्यक्तीचे महत्वाचे डॉक्युमेंट.
सैलरी खात्यामध्ये काही महिने सैलरी क्रेडिट झाली नाही तर काय होते ?
जर एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या सैलरी खात्यामध्ये तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळा पर्यंत सैलरी क्रेडिट झाली नाही तर एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) ग्राहकाच्या सैलरी खात्यांचे रूपांतर साधारण सेविंग् खात्यामध्ये करते.
असे जर झाले तर तुम्हाला एसबियाई (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या सैलरी खात्या मधून मिळणाऱ्या सुविधा मागे घेतल्या जातात.