Savings Account Interest Rate : सर्वसामान्य मनुष्य एक एक पैसा जमा करून बँकेमध्ये ठेवत असतो. याकरिता बँकेमध्ये सेविंग अकाउंट देखील बनवत असतो, जेणेकरून आपण कमावलेला पैसा भविष्यात मदतीला येईल आणि जीवनामध्ये अडचणीच्या वेळी हा पैसा कामात येईल. या अनुषंगाने अनेक गरीब लोक दिवसभराची मेहनत करून कमवलेला पैसा बँकेमध्ये जमा करत असतात.
जर तुम्ही देखील तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये खूप सारे पैसे जमा केले असतील आणि या पैशांवर व्याज मिळवायचा असेल तर आता तुम्हाला ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे कारण की काही बँक तुमच्या सेविंग अकाउंटवर जास्तीत जास्त व्याज दर देत आहेत. या व्याजातून कमावलेल्या पैशामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे आणि तुमच्या सेविंग अकाउंट वर तुम्हाला जास्त पैसा मिळत असल्याने भविष्याने तुम्ही अजून पैसा जमा करू शकतो, यामध्ये बँकेचा देखील फायदा आहे.
बचत खात्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीचा पैसा बाजूला काढत असतात. आपल्याला हवे त्यावेळेला आपण या खात्यातून पैसे देखील काढू शकतो व आपली गरज पूर्ण करू शकतो. अनेकदा बचत खात्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त पैसे जमा झाल्यावर बँक आपल्याला व्याज पुरवत असते आणि आकर्षक व्याजदरच्या माध्यमातून देखील ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणते या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या एफ डी एस आय पी देखील करू शकता आणि त्यांच्यावर देखील व्याज मिळवू शकता.
ग्राहकांचा देखील फायदा आहे चला तर मग जाणून घेऊया अशा नेमक्या कोणत्या बँक आहेत जे ग्राहकांना एक लाख रुपये पेक्षा जास्त ठेवीवर चार टक्के पेक्षा जास्त व्याजदर पुरवत आहेत (Savings Account Interest Rate) त्याबद्दल…
RBL बँक (आरबी एल बँक)
आपल्या सर्वांना आरबीएल बँक माहिती आहे. ही खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. नुकतेच या बँकेने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी देखील दिलेली आहे. जर तुमच्याकडे खात्यात निवडक रक्कम जमा असेल तर अशावेळी तुम्हाला या बँकेच्या नियमावलीनुसार तुम्हाला अधिक व्याजदर मिळेल. ही माहिती अधिकृत वेबसाईटवर देखील देण्यात आलेली आहे तसेच ही दरवाढ 21 ऑगस्ट 2013 पासून लागू करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आरबीएल बँकेच्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
जर तुम्ही आरबीएल बँकेचे ग्राहक असाल आणि तुमच्या बचत खात्यामध्ये एक लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्हाला चार 4.25% तसेच एक ते दहा लाखापर्यंतच्या पैशांवर 5.50% दहा लाख ते पंचवीस लाख रुपये वर 6 टक्के व्याजदर मिळत आहे. त्याचबरोबर 25 लागते दोन कोटी रुपयांवर तुम्हाला 0.50 टक्के ने म्हणजेच 7.50 इंटरेस्ट मिळत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
या बँकेच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या सेविंग अकाउंट वर चांगला व्याजदर मिळवू शकता. ही बँक बचत खात्यावर सहा ते सात टक्के व्याज देत आहे. एक लाख रुपये पर्यंतच्या बचत खात्यावर सहा टक्के व्याज आणि त्यापेक्षा जास्त रकमेवर सात टक्के व्याज दिले जात आहे आणि म्हणूनच जर तुम्ही देखील युनिटी स्मॉल फायनान्स बँक ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे तुमच्या पैशांवर अधिकाधिक व्याज मिळाल्यामुळे भविष्यात तुमची रक्कम देखील वाढू शकते.
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्याजदर या संदर्भात ऑफर देखील देत असते. या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना सहा ते सात टक्के व्याजदर देखील पुरवला जातो परंतु यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन देखील ग्राहकांना पाळाव्या लागतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया
एसबीआय बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेमध्ये अनेक ग्राहक आपल्या मेहनतीचा पैसा आवर्जून जमा करत असतात. सध्या भारतीय स्टेट बँक मध्ये सेविंग इंटरेस्ट नुसार बँक आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देखील देत असते. जर तुमच्या बचत खात्यामध्ये दहा कोटी रुपये पर्यंत जर बॅलन्स असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर देखील देत असते.
एचडीएफसी बँक
जर तुमच्या खात्यामध्ये 50 लाखापेक्षा कमी बॅलन्स असेल तर अशावेळी तुम्हाला एचडीएफसी बँक 3 टक्के व्याजदर पुरवते तसेच त्यापेक्षा जास्त रक्कम व 3.50% व्याजदर पुरवते.
कॅनरा बँक
कॅनरा बँक आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या बँकेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स सध्या माध्यमांवर देखील दाखवल्या जात आहेत. जर या बँक मध्ये तुमचे बचत खाते असेल आणि तुम्हाला जर व्याजदर मिळवायचा असेल तर ही बँक तुम्हाला सुवर्णसंधी देखील देत आहे. तुम्ही केलेल्या बचत खात्यातील पैशांवर ही बँक चार टक्के पेक्षा जास्त व्याजदर देत आहे.