PPF : जर तुमच्याकडे बचत केलेला पैसा असेल आणि अशावेळी हा पैसा तुम्हाला गुंतवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. प्रत्येक जण पैसा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो परंतु हा पैसा सुरक्षित राहील ना?
असा विचार देखील अनेकांच्या मनामध्ये येत असतो कारण की कमवलेला पैसा हा एकेक जमा करून साचवलेला असतो ,अशावेळी पैसे जर डुबा lले तर खूप सारे नुकसान होऊ शकते आणि म्हणूनच पैसे गुंतवणूक करताना विचार देखील करायला हवा. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नसेल तसेच नफाही चांगला असेल अशा प्रकारच्या स्कीम तुम्ही जर शोधत असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या लेखाच्या माध्यमातून तुम्ही सहजच चांगला पैसा कमवू शकता.
पीपीएफमध्ये गुंतवा पैसे
जर तुम्हाला कोणत्याही रिस्क शिवाय पैसा गुंतवणूक करायचा असेल तर त्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात पण या सर्वांमधून उत्तम पर्याय हा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा आहे. या योजनेमध्ये तुम्ही पैसा गुंतवणूक केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण व रिस्क भविष्यात सहन करावी लागणार नाही. तुमचा पैसा देखील सुरक्षित राहील.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये कोणताही भारतीय व्यक्ती पैसा गुंतवणूक करू शकतो. पीपीएफ मध्ये दरवर्षी तुम्ही दीड लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करू शकता तसेच सुरुवातीला तुम्ही खाते उघडण्यासाठी पाचशे रुपये पासून सुरुवात देखील करू शकता आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांना भविष्य निर्वाह निधी ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही चांगली बचत तसेच पैश्यांवर परतावा देखील घेऊ शकता.
या योजनेमध्ये तुम्ही पैसा गुंतवणूक केला तर तुम्हाला पंधरा वर्षासाठी पैसे गुंतवणूक करता येईल त्याचबरोबर या गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला चक्रवाढ देखील मिळतो आणि म्हणूनच पीएफ सध्या 7.1% दराने व्याजदर दिला जातो. जर तुम्हाला देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दर महिन्याला पाचशे रुपये पासून 2000, 3000 व 5000 रुपये देखील गुंतवणूक करू शकता.
जर तुम्ही दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये भरल्यास तुमच्या एका वर्षाची रक्कम 24 हजार रुपये होते या रकमेप्रमाणे पंधरा वर्षांमध्ये तुम्हाला तीन लाख साठ हजार रुपये जमा होतात व या रकमेवर 7.1 व्याजदराने 2 लाख 90 हजार 913 रुपये मिळतील एकूण तुम्हाला 6 लाख 50 हजार 913 रुपये इतका फायदा होईल.
3 हजार वर मिळेल इतका व्याजदर
जर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यामध्ये महिन्याला तीन हजार रुपये जमा करत असाल तर एका वर्षामध्ये 36 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यानंतर 5 लाख 40 हजार प्रमाणे पंधरा वर्षांमध्ये तुम्हाला 4 लाख 36 हजार 370 रुपये व्याज मिळतील अशा प्रकारे जेव्हा ही स्कीम पंधरा वर्षांनी पूर्ण होईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये 9 लाख 76 हजार 370 रुपये जमा होतील.
4 हजार वर मिळेल इतका व्याजदर
जर तुम्ही पीपीएफ खात्यामध्ये महिन्याला चार हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर तुमची वर्षाची गुंतवणूक ही 48000 रुपये होईल अशा प्रकारे 15 वर्षांमध्ये तुमच्या खात्यामध्ये सात लाख वीस हजार रुपये जमा होतील या पैशांवर 7.1% प्रमाणे 5 लाख 81 हजार 827 रुपये जमा होऊन पंधरा वर्षानंतर ची ही रक्कम 13 लाख एक हजार 827 रुपये इतकी असेल.
5 हजार वर मिळेल इतका व्याजदर
जर तुम्हाला यापेक्षाही जास्त पैसे गुंतवायचे असतील म्हणजेच दर महिन्याला पीपीएफ मध्ये 5 हजार रुपये जमा करणार असाल तर तुम्हाला 5000 प्रमाणे महिन्याला पैसे गुंतवणूक करून वर्षाला 60 हजार रुपये खात्यामध्ये जमा होतील व पंधरा वर्षात ही गुंतवणूक 9 लाख रुपये एवढी होईल तसेच या रकमेवर तुम्हाला व्याजदर देखील चांगले मिळेल 7.1 या व्याजदरच्या पद्धतीने 7 लाख 27 हजार 284 रुपये इतके व्याज मिळेल आणि वर्षाच्या शेवटी म्हणजेच पंधरा वर्षानंतर 16 लाख 27 हजार 284 रुपये तुम्हाला मिळतील.