National Pension Scheme: साधारण निवृती नंतरच्या पेन्शन च मूळ उद्देश हा असतो की,पेन्शन च्या योजने वरून लोकांना आपल्या उतार वयात आर्थिक सुरक्षा मिळावी.बऱ्यापैकी निवृत्त झालेल्या लोकांकडे कमाई चा कोणताही सोर्स नसतो.अशावेळी त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी.
त्यांच्या उतार वाटत त्यांना पैशांमुळे कोणत्याही सुख सुविधांचा लाभ घेण्यामध्ये अडचण येऊ नये, म्हणून सरकारने अशा खूप पेन्शन चा योजनेची स्थापना केली आहे,ज्याचा फायदा घेऊन आपण आपले निवृती नंतरचे आयुष्य सुखमय आणि आनंदी जगू शकतो.
अशाच एका पेन्शन च्या योजने बद्दल म्हणजे “राष्ट्रीय पेन्शन प्रणाली” बद्दल आपण या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत.पेन्शन द्वारे लोकांना बचतीचा फायदा होतो आणि लाँग टर्म साठी त्यांना बचत केल्या पेक्षा जास्त रक्कम मिळते.संयुक्त राष्ट्र जनसंख्या चा रिपोर्ट नुसार एक भारतीय साधारण ६५ वर्ष इतके जगतो .
परंतु संयुक्त राष्ट्र जनसंख्या यांच्यामते २०५० पर्यंत लोकांची साधारण आयु ७५ इतकी होईल.ह्या वाढत्या साधारण आयु मुळे निवृती नंतर मिळणाऱ्या पेन्शन चे महत्व खूप वाढले आहे.जास्तीत जास्त भारतीयांना आपल्या निवृत्तीनंतर च्या आयुष्यात आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणून सरकारने “राष्ट्रीय पेन्शन प्रणाली” ची स्थापना केली.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली विषयी थोडक्यात
भारत सरकारने देशात पेन्शन क्षेत्राच्या विकासासाठी १० ओकॉटबर २००३ मध्ये “पेन्शन विधी विनियामक” ची स्थापना केली.त्यानंतर एका वर्षाने म्हणजे १ जानेवारी २००४ मधे भारत सरकारने लोकांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणून “राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS)” ची स्थापना केली.
सुरवातीला ही पेन्शन योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. म्हणजे या योजनेचा लाभ फक्त सरकारी कर्मचारीच घेऊ शकत होते.परंतु १ मे २००९ पासून ही योजना देशातील प्रत्येक नागरिकासाठी चालू करण्यात आली,जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकेल.२०१०-११ मधे भारत सरकारने “स्वावलंबन योजनेची” सुरवात केली.स्वावलंबन योजने अंतर्गत सरकार प्रत्येक (NPS) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली तील लोकांना दर वर्षाला रुपये १००० ते रुपये १२,००० इतक्या रकमेचा लाभ देते.
राष्ट्रीय पेन्शन प्रणाली योजने संबंधी लोकांना पडणाऱ्या जास्त करून प्रश्नांची उत्तरे देऊयात :
1. NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) च्या अंतर्गत कोणकोणते वेगवेगळे विभाग आहेत ?-
NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) चा अंतर्गत दोन विभाग येतात ,ते दोन वेगवेगळे विभाग खालीलप्रमाणे:
१) सरकारी सेक्टर
A) केंद्र सरकार- केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ मध्ये NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) ची सुरवात केली होती.
B) राज्य सरकार – केंद्र सरकार नंतर विविध राज्याने NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) ची सुरवात केली.
२) प्रायव्हेट सेक्टर –
A) कॉर्पोरेट – जे कोण कॉर्पोरेट जॉब करत असेल तर त्यांना या सेक्टर नुसार NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) चा लाभ घेता येईल.
जर असा व्यक्ती वरील कोणत्याही सेक्टर चा अंतर्गत कवर होत नसेल ,तरीही तो NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2. आपण NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) चे खाते का उघडले पाहिजे ?-
NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) चे खाते उघडण्याचे खूप फायदे आहेत,त्यातील काही फायदे खालीलप्रमाने:
- व्यक्ती,कर्मचारी यांच्यासाठी करलाभ
- बाजार सबंधित विशेष रिटर्न
- कॉस्ट इफेक्टिव प्रोडक्ट चा लाभ
- पेन्शन फंड द्वारे व्यवसायामध्ये लाभ
3. NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते ?-
भारताचा कोणताही नागरिक ज्याचे वय १८ ते ६५ च्या दरम्यान आहे ,तो NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) योजनेचा लाभ उचलू शकतो.
जो व्यक्ती भारतीय नाही तो व्यक्ती NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) योजनेचा लाभ उचलू शकतो का ?
असा व्यक्ती जो भारतीय नागरिक नाही ,असा व्यक्ती देखील NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) चे खाते उघडू शकतो.परंतु जो व्यक्ती भारतीय नाही तो व्यक्ती PIO आणि HUF चे खाते उघडू शकत नाही.
4. मी एका वेळी एका पेक्षा जास्त National Pension Scheme खाते उघडू शकतो का ? आणि ते यशस्वी रित्या चालवू शकतो का ?
या प्रश्नांचे उत्तर नाही आहे. NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) एका व्यक्तीला एका पेक्षा जास्त NPS खाते उघडण्याची परवानगी देत नाही.
5. मी माझ्या पती/पत्नी, मुले यांचे National Pension Scheme एकच संयुक्त खाते उघडू शकतो का ?
तर याचे उत्तर नाही आहे.तुम्ही NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) खाते हे कुटुंबातील जास्त लोकांमध्ये मिळून उघडता येत नाही.तुम्ही तुमचे NPS (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) चे स्वतंत्र खाते उघडू शकता .