Money Saving : हल्ली महागाईचा जमाना आहे. खर्च तर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे, अशावेळी Money Saving करणे देखील गरजेचे आहे परंतु ही Money Saving करायची तरी कशी हा देखील मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर निर्माण होत असतो. थोडेफार पैसे वाचवले तरी अचानकपणे येणारे खर्च संपूर्ण खाते रिकामे करून टाकतात.
जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याचा एक मूलमंत्र सांगणार आहोत. या मूलमंत्राच्या माध्यमातून तुम्ही दिवसाला शंभर रुपये जरी बाजूला काढले तरी लाखो रुपयाची गुंतवणूक सहजच करू शकता, चला तर मग जाणून घेऊया की कशाप्रकारे आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्याबद्दल…
जर तुम्हाला पैसे गुंतवणूक करण्यासाठी एखादी योजना जाणून घ्यायची आहे तर आपल्या जीवनामध्ये पन्नास रुपये पासून ते 5000 पर्यंत अशा अनेक योजना असतात परंतु अनेकांना त्यांची माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक चांगला योजनेबद्दल देखील सांगणार आहोत तुम्हा सर्वांना एसआयपी माहिती असेल तसेच म्युच्युअल फंड बद्दल देखील तुम्ही अनेकदा ऐकले असेल.
बहुतेक वेळा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे रिक्स देखील मानले जाते परंतु तुम्ही कशा प्रकारची रिस्क उचलता यावरून देखील भविष्यातील गुंतवणूक करत असते. तुम्ही ज्या पद्धतीने पैसे गुंतवणूक करतात, त्यावर देखील तुमच्या पैशांचा परतावा करत असतो.
गेल्या अनेक वर्षांपासून म्युच्युअल फंडमध्ये चांगले पैसे देखील लोकांना प्राप्त झालेले आहे आणि अनेक जण म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवणूक करण्यासाठी पुढे आलेले पाहायला मिळतात. तुम्ही दिवसाला शंभर रुपये वाचवून 68 लाख रुपये देखील कमवू शकतात, हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल परंतु हे खरे आहे.
दिवसाला बाजूला ठेवा १०० रुपये
तुम्हाला दररोज शंभर रुपये बाजूला काढून एका चांगल्या म्युचल फंड मध्ये हे पैसे गुंतवणूक करायचे आहेत. तुम्ही एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला तीन हजार रुपये गुंतवू शकता. ही गुंतवणूक तुम्हाला तीस वर्षासाठी करावी लागणार आहे याचबरोबर तुम्हाला गुंतवणूक केलेल्या पैशांवर दर वर्षाला दहा टक्के व्याजदर देखील रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही तीन वर्षानंतर ही रक्कम पाहिली तर तुम्हाला 68 लाख रुपये सहजच मिळू शकता. या पैशामुळे तुम्ही तुमचे भवितव्य उज्वल बनू शकता. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हे पैसे सहजच कामाला येऊ शकतात. शंभर रुपये दिवसाला गुंतवणूक केल्यामुळे येणाऱ्या दिवसात तुमचे आर्थिक स्वातंत्र्य चांगले राहील तुम्हाला पैशांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
रिस्क जाणून घ्या
परंतु म्युचल फंड मधील वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसा गुंतवणूक करत असताना तज्ञ मंडळींची देखील मदत घेणे गरजेचे आहे, कारण की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेले पैसे अनेकदा रिस्क म्हणून देखील ओळखले जातात, अशावेळी जर पैसे शेअर मार्केट नुसार कमी जास्त झाले तर त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणूक वर होऊ शकतो.
आणि म्हणूनच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेले पैसे हे बाजाराच्या व्यवहारावर ठरत असतात अशावेळी तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारे तुम्ही दिवसाला थोडीशी रक्कम बाजूला सारून महिन्याला एखादी चांगली रक्कम जमा करून म्युच्युअल फंडमध्ये चांगले पैसे गुंतवणूक करू शकता.