LIC Aadhaar Shila Yojana : प्रत्येक आयुच्या लोकांसाठी भारत सरकार सारखे नवीन पेन्शन योजना घेऊन येत असते.जेणेकरून त्या योजनेचा लाभ वेगवेगळ्या आयुतील लोकांना होईल.LIC ने अशा भरपूर योजना आणल्या आहेत ज्या की फक्त खासकरून महिला वर्गासाठी आहेत.आज आपण अशाच एका LIC चा योजनेची माहिती पाहणार आहोत.
ज्यात तुम्ही गुंतवणूक करून लाँग टर्म साठी मोठी रक्कम मिळवू शकता.ह्या योजनेचे नाव “LIC आधार शीला योजना” असे आहे आणि ही योजना खासकरून महिलांसाठी आहे.“LIC आधार शीला योजना” या योजनेचे मुख्य उद्देश हे आहे के,भरतील प्रत्येक स्त्री ला या योजेअंतर्गत आर्थिक सुरक्षा मिळावी.या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलेने सगळे प्रीमियम वेळेवरती भरले तर शेवटी त्या महिलेला लोयल्टी म्हणून विशिष्ट रक्कम मिळते.
ह्या योजनेची खास गोष्ट ही आहे की या योजनेमध्ये तुम्ही दर दिवसाला ८७ रुपये इतकी गुंतवणूक करून लाँग टर्म मध्ये ११ लाख पर्यंतची रक्कम प्राप्त करू शकता.जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणुक करू इच्छिता तर तुम्हाला आम्ही या लेखाच्या मार्फत या योजनेची योग्य आणि हवी ती माहिती देणार आहोत.“LIC आधार शीला योजना” ही एक नॉन लिंकड योजना आहे आणि विशेष म्हंजे या योजनेमध्ये फक्त महिलाच गुंतवणुक करू शकतात.
कोणत्याही पुरुषाला या योजनेमध्ये गुंतवणुक करता येत नाही,कारण ही “LIC आधार शीला योजना”भारत सरकारने LIC मार्फत खासकरून महिलांसाठी बनवली आहे.ह्या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या स्त्रीला वयाच्या ७० नंतर चांगली रक्कम मिळते.पॉलिसी पूर्ण व्हायच्या अगोदर पॉलिसी होल्डर चा मृत्यू झाला तर ह्या योजनेअंतर्गत होणारा लाभ मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना होतो.
कोण व्यक्ती या LIC Aadhaar shila Yojana मध्ये गुंतवणुक करू शकतो?
प्रत्येक भारतीय महिलांकडे शक्यतो आधार कार्ड असतेच,परंतु काही महिलांकडे आधार कार्ड नसेल तर त्या महिला “LIC आधार शीला योजना” या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत.ह्या योजनेमध्ये आधार कार्ड असणाऱ्या महिला गुंतवणूक करू शकतात.या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे वय ८ ते ५५ चा दरम्यान असले पाहिजे.
“LIC आधार शीला योजनेला” तुम्ही १० ते २० वर्षाच्या अवधी पर्यंत खरेदी करु शकता.maturity वेळी महिलांचे अधिकतम वय ७० वर्ष इतके असलेपाहिजे.जर “LIC आधार शीला योजनेमध्ये” गुंतवणूक करणाऱ्या महिलेचे वय ५५ इतके असेल तर त्या महिला या “LIC आधार शीला योजनेमध्ये” पुढच्या १५ वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात.ह्या “LIC आधार शीला योजने अंतर्गत “ तुम्हाला २ लाख ते ५ लाख पर्यंतचा सम इश्योर्ड मिळू शकतो.
“LIC Aadhaar shila Yojana” या योजनेअंतर्गत तुम्हाला ११ लाख रुपये कशा पद्धतीनें मिळू शकतील
जर तुम्हाला शेवटी maturity वेळी “LIC आधार शीला योजना” या योजेअंतर्गत ११ लाख रुपये एवधी रक्कम हवी असेल तर तुम्हाला दर दिवसाला ८७ रुपये इतकी गुंतवणूक करायला हवी.दिवसाला ८७ रुपयाच्या मानाने तुम्हाला वर्षाला ३१,७५५ रुपये इतकी रक्कम गुंतवायला हवी .तुमचा वर्षाचा प्रीमियम ३१,७५५ इतका असेल तर १० वर्षामध्ये तुम्हाला ३,१७,५५० इतकी रुपये गुंतवणुक करावी लागेल, तेव्हा तुम्हाला वयाच्या ७० व्या वर्षी ११ लाख इतकी रक्कम maturity म्हणून रक्कम मिळेल,वयाच्या ७० वया वर्षी तुम्ही ही रक्कम withdraw करू शकता.
“LIC आधार शीला योजना” चा लाभ घेण्यासाठी महिलेकडे खालील डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे:
- आधार कार्ड
- वोटर आयडी कार्ड
- पासपोर्ट साइज् फोटो
- ड्रायव्हिंग लायसन्स
- लाईट बिल
- रेशन कार्ड
- इन्कम टॅक्स रिटर्न
- हेल्थ रिपोर्ट
खालील स्टेपस चा मदतीने तुम्ही “LIC आधार शीला योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी निवेदन करू शकता :
- सुरवातीला तुम्ही LIC च्या ऑफिशियल पेज वरती जा.
- LIC चा ऑफिशियल पेज वरती तुम्हाला “LIC आधार शीला योजना” असा पर्याय दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला समोर निवेदन पत्र दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला पुढच्या पेज वरती “LIC आधार शीला योजना” साठी लागणारी आवश्यक माहिती विचारतील ,ती माहिती तुम्ही व्यवस्थित भरा.
- त्यानंतर त्या पेज वरती दिलेले डॉक्युमेंट योग्यरीत्या अपलोड करा.
- डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर पुढे सबमिट चा पर्याय असेल,त्यावरती क्लिक करा.
- अशा पद्धतीनं तुमचे “आधार शीला योजनेमध्ये” निवेदन सबमिट होईल.