तुमच्या बँक खात्याची घरबसल्या करा आता KYC Update सोप्या स्टेप्स फॉलो करून

KYC Update : हल्ली तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण घरबसल्या अनेक काम करू शकतो. लॉकडाऊन नंतर वर्क फ्रॉम होम व इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपण एका क्लिकवरच आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकतो व आपल्या ज्ञानांमध्ये भर पाडू शकतो.

हल्ली सगळे व्यवहार देखील डिजिटल झालेले आहे. डिजिटल माध्यमातून आपण बँकेचे व्यवहार देखील मोठ्या प्रमाणावर करतो. पूर्वीचा एक काळ असा होता की बँक खात्यांमधील जे काही तपशील आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला बँक मध्ये जावे लागायचे परंतु आता परिस्थिती बदललेली आहे.

अनेकदा बँक वाले आपल्याला त्रास देखील देतात जर आपले कागदपत्र अपडेट नसतील तर आपल्याला कोणत्याही का सुविधांची मदत घेता येत नाही यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होतात जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड न करता बँकेमध्ये एकदा भेट द्या किंवा तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर देखील लाभ घेण्याचा प्रयत्न करा.

आता बँक देखील इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील याचा विचार करत असतात. आता अनेक बँका लोकांच्या मदतीसाठी व लोकांना सोयीस्कर रित्या बँकेचे व्यवहार करता यावेत याकरिता घरबसल्या अनेक सेवा पुरवत असतात.

काही दिवसांपूर्वीच आरबीआयने एक पत्रक देखील जारी केले होते. या पत्रकामध्ये बँकेतील ग्राहकांनी आपल्या बँकेचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही बँकेमध्ये वैध कागदपत्रे सबमिट केली असतील जसे की, तुमचा पत्ता बदललेला नसेल तर तुम्ही घरबसल्या देखील इंटरनेटच्या मदतीने व बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचे कागदपत्र अपडेट करू शकतात. हे सर्व कागदपत्र अपडेट करण्यासाठी तुम्हाला पाच ते दहा मिनिटांचा अवधी लागू शकतो असे देखील सांगण्यात आले आहे.

घरीच करा KYC Update

घरबसल्या जर तुम्हाला केवायसी अपडेट करायचे असेल तर यासाठी एक तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागेल. या डिक्लेरेशनच्या माध्यमातूनच तुम्ही घरबसल्या केवायसी अपडेट करू शकता यामुळे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन लांब रांगा लावाव्या लागणार नाहीत तसेच घरबसल्या देखील तुम्ही सर्व कागदपत्र अपडेट करू शकता. काही सोप्या स्टेपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या बँकेचे केवायसी अपडेट करू शकतात, त्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

असे करा केवायसी अपडेट

बँक केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जायचे आहे आणि त्यानंतर नेट बँकिंग पर्याय निवडायचा आहे, असे केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे त्यानंतर केवायसी टॅब वर क्लिक करून ज्या काही सूचना तुमच्या स्क्रीनवर दिसतील त्या सर्व सूचनांचे पालन आपल्याला करायचे आहे

जसे की नाव, तुमच्या घराचा पत्ता, जन्मतारीख इत्यादी महत्त्वाची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या पर्यायानुसार भरायचे आहे.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड आणि महत्त्वाचे कागदपत्र लागेल. हे सर्व कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या सरकारी ओळखपत्रचे फोटो दोन्ही बाजूने तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे.

हे सारे आवश्यक कागदपत्र अपलोड केल्या नंतर तुम्हाला सबमिट चे बटन वर क्लिक करायचे आहे. सगळ्यात शेवटी तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल. या नंबर च्या माध्यमातून तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर वर एक एसएमएस येईल. हा एस एम एस तुम्हाला बँक मेल किंवा मोबाईल वर येईल
या माध्यमातून देखील तुम्हाला अपडेट मिळू शकते.

अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉 माहितीसाठी क्लिक करा.

Leave a Comment