Investment Plan : SIP म्हणजे काय ? कशी गुंतवणूक करावी आणि त्याचे फायदे काय ?

Investment Plan : आपण १००० रुपये एसाईपी मध्ये दर महिन्याला गुंतवून ५ वर्षा मध्ये ८९,६८२ रुपये ,१० वर्षामध्ये २,३२,३३९ रूपये आणि २० वर्षा मध्ये ९,९९,१४८ रुपये मिळवू शकतो. पूर्वी जास्तकरून लोक सोने – चांदी ,जमीन यांच्यामध्ये गुंतवणूक करत होते. परंतू बदलत्या वेळे सोबत लोकांचें गुंतवणूक करण्याचे मार्ग देखील बदलले आहेत.आजकाल लोक जमीन, सोने – चांदी यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा शेअर मार्कटमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहे आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात.

शेअर मार्केट मधून मिळणारा जास्त रिटर्न या मुळे लोकांचा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकी करण्याचा कल वाढला आहे. दिवसेंदिवस शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा देखील वाढत जात आहे.परंतु शेअर मार्केट मध्ये जेवढा जास्त रिटर्न आपल्याला मिळतो, तेवढीच मोठी रिस्क शेअर मार्कटमध्ये असते.

असे खूप लोक आहे , ज्यांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून भरपूर पैसे कमवले आहेत. परंतु असे देखील भरपूर जण आहेत ज्यांनी शेअर मार्केट मध्ये पैसे लावले आणि त्यांचे पैसे बुडले आहेत.खुप लोकांनीकर्ज काढून शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्यांचे पैसे बुडले आहेत.या पैसे बुडण्याच्या भीतीने खूप लोक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास घाबरतात.

(Systematic Investment Plan) SIP

परंतु आपण कमी रिस्क घेता एसाईपी मध्ये गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळवू शकतो. आजच्या लेखामध्ये आपण एसाईपी मध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करून आपण चांगला रिटर्न मिळवू शकतो आणि मासिक फक्त १००० रुपये गुंतवून आपल्याला ५ वर्षा मध्ये ,१० वर्षा मध्ये आणि २० वर्षामध्ये किती टक्के पर्यंतचा रिटर्न मिळू शकतो या बद्दल माहिती पाहणार आहोत.सध्या च्या जीवनात एसाईपी हा गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग बनला आहे.आपण एसाईपी द्वारे मुच्युअल् फंड मध्ये गुंतवणूक करून चांगला रिटर्न मिळवू शकतो.

SIP च फुल्ल फॉर्म “Systematic Investment Plan “ असा होतो. एसाईपी द्वारे मुच्यअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे खूप फायदे आहेत.जसे की तुम्ही फक्त ५०० रुपये पासून एसाईपी मध्ये गुंतवणूक करणे चालू करू शकता.आणि वेळेसोबत एसाईपी च्या मासिक रक्कम मध्ये हवी तेवढी वाढ देखील करू शकता.
तुम्हाला जेव्हा एसाईपी मधील गुंतवणूक थांबवायची असेल तेव्हा तुम्ही थांबवू शकता आणि जेव्हा कधी एसाईपी मध्ये गुंतवणूक चालू करायची आहे तेव्हा गुंतवणूक चालू देखील करू शकता.

एसआयसीपी हे शेअर मार्केट शी सलग्न असते ,तरी देखील एसाईपी मध्ये पैसे जाण्याची रिस्क शेअर मार्केट पेक्षा खूप कमी असते.
खूप साऱ्या विषेतज्ञ लोकांचें मत आहे की , एसआयसीपी द्वारे आपण सहज कमीतकमी वार्षिक १२% पर्यंतचा रिटर्न मिळवू शकतो.आपण बँकेमध्ये पैसे गुंतवतो, त्याचे जास्तीत जास्त वार्षिक व्याज आपल्याला ६% किंवा ७% पर्यंत मिळते.७% पेक्षा जास्त व्याजदर आपल्याला बँकेमधून मिळत नाही. परंतु एसाईपी मध्ये आपल्याला कमीतकमी वार्षिक १२% एवढे तरी व्याज मिळतेच मिळते.काही वेळा आपल्याला एसाईपी मध्ये वर्षाला १५% ते २०% पर्यंत देखील ही व्याज मिळते.

SIP मध्ये आपल्याला compounding चा फायदा होतो.जर तुम्ही ह्या आधी एसआईपी मध्ये गुंतवणूक केली नाही आणि पहिल्यांदा एसआईपी मध्ये पैसे गुंतवणूक करणार आहात तर चला पाहुयात १००० रुपये एसआईपी मध्ये गुंतवून आपल्याला ५,१० आणि २० वर्षामध्ये किती रुपये रिटर्न मिळू शकेल?

५ वर्षा पर्यंतची एसआयसीपी Investment Plan

जर तुम्ही दर महिन्याला १००० रुपये ५ वर्ष पर्यंत एसाईपी मध्ये गुंतवले तर तुमचे ५ वर्षापर्यंत १००० रूपये दर महिन्याच्या हिशोबाने ६० रुपये होणार. म्हणजे तुम्ही ५ वर्षामध्ये ६० हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षानंतर २२,४८६ रूपये व्याजदर मिळून तुम्हाला शेवटी ८२,४८६ रुपये मिळणार.जर तुम्ही ज्या एसाईपी मध्ये गुंतवणूक केली आहे ,त्या एसाईपी ने तुम्हाला १५% इतके व्याजदर दिले तर तुम्हाला ६० हजार च्या गुंतवणुकीवर १५% च्या हिशोबाने २९,६८२ इतके व्याजदर मिळणार आणि तुम्हाला शेवटी ८९,६८२ इतके रुपये मिळणार.

१० वर्षा पर्यंतची एसआयसीपी Investment Plan

जर तुम्ही दर महिन्याला १००० रुपये १० वर्षा पर्यंत एसआयसीपी मध्ये गुंतवले तर, तुमचे १० वर्षापर्यंत १००० रूपये दर महिन्याच्या हिशोबाने १,२०,००० रुपये होणार. म्हणजे तुम्ही १० वर्षामध्ये १,२०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला दहा वर्षानंतर १,१२,३३९ रूपये व्याजदर मिळून तुम्हाला शेवटी २,३२,३३९ रुपये मिळणार.

२० वर्षा पर्यंतची एसआयसीपी Investment Plan

जर तुम्ही दर महिन्याला १००० रुपये २० वर्षा पर्यंत एसआयसीपी मध्ये गुंतवले तर, तुमचे २० वर्षापर्यंत १००० रूपये दर महिन्याच्या हिशोबाने २,४०,००० रुपये होणार. म्हणजे तुम्ही १० वर्षामध्ये २,४०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला दहा वर्षानंतर ७,५९,१४८ रूपये व्याजदर मिळून तुम्हाला शेवटी ९,९९,१४८ रुपये मिळणार.

अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

👉 माहितीसाठी क्लिक करा.

2 thoughts on “Investment Plan : SIP म्हणजे काय ? कशी गुंतवणूक करावी आणि त्याचे फायदे काय ?”

Leave a Comment