Investment Plan: मेहनतीचा पैसा गुंतवणूक करतेवेळी घ्या “या” काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या, अन्यथा भविष्यात डूबु शकतो पैसा!

Investment Plan : सर्वसामान्य गरीब माणूस दिवसभर मेहनत कबाड कष्ट करून पैसा कमवत असतो. हा पैसा जमा करून बँकेमध्ये ठेवतो. कधीकधी चार पैसे जास्त आल्यावर आपण कुठेतरी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो व या गुंतवलेल्या पैशातून भविष्यात जास्तीत जास्त रिटर्न मिळतील अशी आशा देखील ठेवत असतो परंतु अनेकदा आपण गुंतवलेला पैसा हा योग्य ठिकाणी गुंतवलेला आहे का? तरच तुम्हाला भविष्यात जास्त पैसे मिळू शकतात.

जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे Investment Plan केले असेल तर भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते. अनेकांना पैसे कोठे? कधी आणि कशाप्रकारे गुंतवणूक करावे ? याबद्दल फारशी कल्पना नसते. जर तुम्हाला देखील पैसे गुंतवणूक करण्याबद्दलची माहिती ज्ञान नसेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पैसे गुंतवणूक करताना आपल्याला नेमके काय करायचे आहे ? कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली भविष्यात फसगत होणार नाही, याबद्दलची माहिती आज आणि तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत.

हल्ली वेगवेगळ्या माध्यमांवर देखील Investment Plan करण्याबद्दल माहिती दिलेली असते. अनेक माध्यमे, वर्तमानपत्र यावर सदर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शो देखील आपल्या प्रेक्षकांसाठी वाचकांसाठी नव्याने आणत असतात. स्टॉक मार्केट वेगवेगळ्या शेअर्सचे मूल्य बाजारभाव त्यांचे विश्लेषण देखील केले जाते आणि अनेक तज्ञ मंडळी आपल्याला गुंतवणूक कशी करायची त्याचे वेगवेगळे मार्ग कसे आहेत याबद्दलची माहिती देत असतात परंतु आपला मेहनतीचा पैसा गुंतवणूक करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे. पुढील मुद्दे तुम्हाला गुंतवणूक करताना उपयुक्त ठरू शकतील. या मुद्द्यांमुळे भविष्यात तुमची फसवणूक देखील होणार नाही.

ऐकलेल्या माहितीवर अवलंबून राहू नका.

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात, जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत असतात. ह्या एखाद्या शेअरमध्ये पैसा गुंतवणूक करा. एखादे शेअर विकत घ्या, असे सल्ले देत असतात परंतु लोक तुम्हाला जे सांगतील त्या पद्धतीने करू नका.

तुम्हाला एक म्हण माहिती असेल की” ऐकावे जनाचे पण करावे मनाचे” ही म्हण प्रत्यक्ष जीवनात देखील वापरायला हवी तशीच पैसा गुंतवणूक करताना देखील करायला हवा अन्यथा नाही तर तुम्हाला पश्चाताप होण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या शेअरमध्ये पैसा गुंतवणूक करताना त्याचा इतिहास, बाजाराची परिस्थिती आणि भविष्यातील तरतुदी या गोष्टी जाणून घ्या.

शेअर आणि त्यांचा बाजारामध्ये असलेला सध्याचा भाव

आपल्यापैकी अनेक जण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करण्यासाठी इंटरेस्ट असतो परंतु अशावेळी सध्या वेगळ्या प्रकारचे नेमके शेअर कोणकोणते आहेत. मार्केटमध्ये त्यांचे भाव काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. अनेकजण एखादा शेअर कमी झाला असेल तर तो लगेच विकत घेण्याचा प्रयत्न करतात परंतु असे करू नका.

शक्यतो त्या शेअरचे मूल्य काय आहेत त्याची टक्केवारी काय आहे. नफा – तोटा यासारखे गणित पाहूनच त्या शेअरमध्ये पैसा गुंतवणूक करा नाहीतर नुकसान होऊ शकते. योग्य संधी बघूनच शेअर विकत घेणे व योग्य संधी पाहूनच शेअर विकणे हे देखील तितकेच गरजेचे आहे.

नको असलेले शेअर वेळच्यावेळी विकून टाका

आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे शेअर विकत घेण्याची सवय असते परंतु अशावेळी अनावश्यक शेअर विकून टाका. काही स्टॉक असे असतात की ज्यांची भविष्यात गॅरंटी नसते तसे या शेअरमधून जास्त पैसा मिळेल याची शाश्वती देखील नसते आणि म्हणूनच वेळ मिळताच नको असलेले शेअर विकून टाका. काही शेअर टॅक्स मधून देखील वगळलेले असतात. या शेअरचा तुम्हाला भविष्यात लाभ होण्याची देखील शक्यता नसते.

चालू घडामोडीला घाबरू नका

अनेकदा मार्केट मध्ये चढ उतार होत असतात, अशावेळी तुम्ही जे काही शेअर घेतलेले आहेत किंवा पैसा गुंतवणूक केलेला आहे त्या योजनेमध्ये काही प्रमाणात फरक बदलू शकतो, अशावेळी कोणत्याही प्रकारचा भावनिक निर्णयाने घेता संयम बाळगणे अत्यंत गरजेचं आहे.

काही शेअर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी देखील गुंतवलेले असतात तर अशावेळी योग्य नियोजन करूनच पैसा विचारपूर्वक गुंतवणूक करा. एखादा पोर्टफोलिओ मध्ये चढउतार जर होत असेल तर त्यानुसार योग्य विचार करूनच पैसा गुंतवणूक करा.

संयम बाळगणे

जर तुमच्या अंगी संयम असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट अगदी शांत डोक्याने करू शकतात. अनेकदा आपण ज्या ज्या योजनेमध्ये पैसा गुंतवणूक केलेला आहे त्या योजनेतून आपल्याला रिटर्न मिळण्यासाठी वेळ लागतो, अशावेळी योग्य वेळे येईल तोपर्यंत तुमच्याकडे संयम असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला गुंतवलेल्या पैशातून योग्य नफा मिळू शकतो.

शक्यतो अनुकरण करू नका

अनेकदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेअर मार्केटच्या फंड बद्दल जाणून घेत असतो. जाहिराती न बळी पडून कोणतेही शेअर विकत घेऊ नका. जर तुम्हाला या शेअर बद्दल माहिती नसेल तर तज्ञ मंडळींची मदत घ्या आणि त्यानंतरच तुमचा मेहनतीचा कमावलेला पैसा गुंतवा अन्यथा भविष्यात तोटा सहन करावा लागू शकतो.

Leave a Comment