Income Tax Return : प्राप्तीकर विभागाने असे म्हटले आहे की वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न भरूनही सुमारे ३१ लाखापेक्षा अधिक करदात्यांचा कर परतावा अडकुन राहु शकतो.ह्या सर्व कर दात्यांनी अंतिम मुदत संपण्याच्या आधी २०२२-२०२३ वर्षाकरीता इन्कम टॅक्स रिटर्न भरला होता.पण करदात्यांनी केलेल्या काही सर्वसामान्य चुकांमुळे त्यांना रिफंड प्राप्त झाला नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की ह्या वर्षी करदात्यांनी विपुल प्रमाणात आयटी आर दाखल केले होते.पण आयटीआर दाखल करताना केलेली एक छोटीशी चुक करदात्यांना फार महागात पडली आहे.लाखो करदात्यांनी २०२२-२०२३ करीता तारखेच्या आधी प्राप्तीकर विवरणपत्र भरले होते तरी देखील पण तरी देखील काही करदात्यांचा आयटीआर सत्यापित करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
आयकर व्हॅलिडेट करणे का आवश्यक असते?
आयकर विवरणपत्र भरण्याच्या तारखेपासून आयकर विभागाकडून टॅक्स व्हॅलिडेट करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जातो.ह्या कालावधीत आयकर रिटर्न व्हॅलिडेट करणे करदात्यांसाठी फार महत्वाचे आहे.या कालावधी नंतर करदात्यांना आपल्या भरलेल्या जास्त कराचा परतावा मिळत नाही.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे करदात्यांनी निर्धारित कालावधीतच रिटर्नची पडताळणी करणे आवश्यक आहे अन्यथा करदात्यांचा आयकर रिटर्न अमान्य केला जाऊ शकतो.म्हणजे भरलेला रिटर्न देखील अमान्य करार दिला जातो.
आयकर विभागाने असे म्हटले आहे की आयकर रिटर्न व्हॅलिडेट न केला गेल्यास आयकर विभागाकडुन रिटर्न करीता करदात्यांनी दाखल केलेल्या आयटी आर वर प्रोसेस करण्यात येणार नाही.
ज्याचे परिणाम स्वरूप करदात्यांना पुन्हा विवरणपत्र भरावे लागणार आहे.म्हणुन करदात्यांनी वेळ असताच आयटी आर फाईल करताना केलेल्या चुकांची दुरुस्ती करायला हवी.अन्यथा त्यांचा आयटीआर अवैध मानला जाऊ शकतो.
आयकर व्हॅलिडेट न केल्यास काय होईल?
समजा एखाद्या करदात्याने आपला आयटी आर व्हॅलिडेट केला नाही तर त्याच्याकडुन भरण्यात आलेल्या आयटी आर रिटर्न वर कुठलीही प्रोसेस होत नसते.प्राप्तीकर विभागाने आपल्या संकेतस्थळावर एक आकडेवारी जाहीर केली आहे त्या आकडेवारीनुसार २३ आॅगस्ट २०२३ पर्यंत करदात्यांकडुन तब्बल ६.९१ कोटी इतके रिटर्न आतापर्यंत भरण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे.
पण ह्या सर्व करदात्यां मध्ये काही मोजक्याच करदात्यांनीच म्हणजे ६.५९ कोटी इतक्याच करदात्यांनी विवरणपत्र सत्यापित केले आहे असे प्राप्तीकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येते.
Income Tax Return व्हॅलिडेट कसा केला जातो?
आयटीआर हा आपणास वेगवेगळ्या प्रकारे व्हॅलिडेट करता येतो.पहिली पद्धत आहे आॅफलाईन अणि दुसरी आॅनलाईन.यात आॅनलाईन पदधती मध्ये करदाता आयकर रिटर्न व्हॅलिडेट करण्यासाठी तब्बल पाच पदधतींचा वापर करू शकतात.हा सर्व पद्धती आॅनलाईन आहेत.अणि आॅफलाईन पद्धतीने आयकर रिटर्न व्हॅलिडेट करण्यासाठी एकच पदधत आहे.
आपल्या रेजिस्टर मोबाईल नंबर,बॅक अकाऊंट नंबर,डीमॅट अकाऊंट,नेटबॅकिंग तसेच एटीएम इत्यादीवर ओटीपी प्राप्त करून करदाता आपले इन्कम टॅक्स रिटर्न आॅनलाईन पदधतीने व्हॅलिडेट करू शकतात.
याचठिकाणी जर आपण आॅफलाईन पदधतीचा वापर केला तर यात आयटी आर व्ही फाॅमची एक झेरॉक्स ज्यात सही केलेली असेल ती आपणास आयकर विभागाकडे पोस्टाने पाठवावी लागते.तेव्हा ही आॅफलाईन प्रक्रिया पूर्ण होत असते.
Income Tax Return म्हणजे काय?
इन्कम टॅक्स रिटर्न दुसरे काही नसुन केंद्र सरकारच्या आयकर विभागास आपण आपल्या उत्पन्नाची दिलेली माहीती असते.यात आपणास एक फाॅम भरावा लागतो.यातच करदात्याच्या उत्पन्नाची माहीती दिलेली असते.
Income Tax Return कोणाला फाईल करावा लागतो?
ज्या व्यक्तीचे उत्पन्न शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असते त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक असते.शासनाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तीने इन्कम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे आहे.सर्व नोकरदार व्यक्तींनी व्यवसाय उद्योग करत असलेल्या व्यक्तींनी देखील इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे गरजेचे असते.
इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचे फायदे
आपले उत्पन्न करपात्र नसले तरी देखील इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून कापण्यात आलेल्या टीडीएस वर टॅक्स रिफंड प्राप्त करता येतो.
टॅक्स सेविंग इन्व्हेस्टमेंट वर कट करण्यात आलेल्या टीडीएस वर रिटर्न फाईल करता येतो अणि आपले पैसे पुन्हा प्राप्त करता येतात.