Gratuity Calculator : तुम्ही जर जॉब करत आहात आणि एका कंपनीमध्ये खूप वर्षांपासून नोकरी करत आहात आणि तुम्हाला जर Gratuity कॅलक्युलेटर बद्दल जराही माहिती नाहीये तर तुम्ही हा लेख नक्की वाचा ,या लेखाच्या शेवटी तुम्हाला Gratuity बद्दल समजेल आणि तुम्ही तुमचा Gratuity स्कोर चेक देखील कराल.
कोणत्याही कंपनीमध्ये सतत पाच वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना Gratuity मिळते.त्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्याने त्याला दर वर्षाला त्याचा १५ दिवस पगार Gratuity म्हणून मिळतो.
ज्या कर्मचाऱ्याने एका कंपनीमध्ये जेवढी जास्त वर्ष नोकरी केली आहे तेवढंच जास्त त्याला Gratuity मिळतो.आज आपण या लेखामध्ये Gratuity बद्दल माहिती पाहणार आहेत आणि Gratuity कॅल्क्युलेट कसा करायचा,याबद्दल देखील माहिती पाहणार आहोत. मग चला आजच्या लेखाला सुरवात करूयात.
ग्रॅच्युईटी ची गणना कशा पद्धतीने करतात ?
जे कर्मचारी Gratuity ॲक्ट च्या अंतर्गत रजिस्टर असणाऱ्या संस्थांमध्ये काम करतात ,ते आपला Gratuity खालील पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतात.
ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट = कंपनीतील शेवटचा पगार * त्या कंपनीमध्ये एकूण किती वर्ष काम केले त्याचा आकडा* १५/२६
आपण Gratuity चे उदाहरण पाहू :
समजा रमेश नावाचा कर्मचारी आहे आणि त्याने एका Gratuity ॲक्ट मध्ये रजिस्टर कंपनीमध्ये ११ वर्ष काम केले आणि त्याचा पगार महिन्याला तीस हजार इतका होता तर त्याचा Gratuity कॅल्क्युलेट खालीलप्रमाणे कॅल्क्युलेट होणार :
Gratuity कॅल्क्युलेट = कंपनीतील शेवटचा पगार * त्या कंपनीमध्ये एकूण किती वर्ष काम केले त्याचा आकडा* १५/२६
= ३०,००० * ११ *१५/२६ = १.९० लाख रुपये
म्हणजे रमेश ला नोकरी सोडल्यानंतर पीएफ आणि पेन्शन व्यतिरिक्त १.९० लाख रुपये इतका Gratuity मिळणार.
15/26 चा उपयोग का आहे ?
Gratuity अंतर्गत कर्मचाऱ्याला एका महिन्यातील १५ दिवसाचा पगार मिळतो.महिन्याला तीस दिवस असतात,पण रविवारची सुट्टी सोडली तर एक कर्मचारी एका महिन्यामध्ये २६ दिवस काम करतो ,म्हणून Gratuity कॅल्क्युलेटर मध्ये १५/२६ चा वापरतात.
काय आहे Gratuity Calculator 2023 ? आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करतात.
Gratuity कॅल्क्युलेटर हे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुम्हाला किती वर्ष काम केल्यानंतर किती Gratuity मिळणार हे कॅल्क्युलेट करू शकता.तुम्ही या सोफ्टवेअर चा मदतीने एका मिनिट मध्ये तुम्हाला किती Gratuity मिळणार हे जाणून घेऊ शकता.
जर कंपनी रजिस्टर नसेल तर त्या कंपनीतील कर्मचाऱ्याचा Gratuity Calculator करण्याचा फोम्र्युला कोणता आहे ?-
जर कर्मचारी काम करत असलेली कंपनी Gratuity ॲक्ट चा अंतर्गत रजिस्टर नसेल ,तरी पण अशा कंपनीतील कर्मचारी Gratuity प्राप्त करू शकतो.परंतु अशावेळी त्या कर्मचाऱ्याला महिन्यातील दिवसाची संख्या तीस धरली जाते ,ना की 26.
ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेट = कंपनीतील शेवटचा पगार * त्या कंपनीमध्ये एकूण किती वर्ष काम केले त्याचा आकडा* १५/३०
जर Gratuity ॲक्ट चा अंतर्गत रजिस्टर नसलेल्या कंपनीमध्ये काम करत असलेल्या कर्माचाऱ्याने त्या कंपनीमध्ये २० वर्ष ११ महिने काम केले तर त्याला फक्त २० वर्षात काम केलेल्याचा Gratuity मिळणार ,त्याला वरील १० महिने काम केलेल्या Gratuity मिळणार नाही.
Gratuity कॅल्कयुलेटर चा मदतीने आपण आपला Gratuity amount काढू शकतो,परंतु कंपनी जास्त देखील Gratuity अमाऊंट आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ शकते. परंतु नियमानुसार कोणतीही कंपनी २० लाख पेक्षा जास्त चा Gratuity ammount देऊ शकत नाही.
ज्या कंपनीमध्ये एका वर्षात काम खूप कमी असते अशा कंपनीतील कर्मचाऱ्यांना Gratuity देताना महिन्याचे १५ दिवस धरण्या ऐवजी ७ दिवस धरले जातात.
जास्तीत जास्त किती पर्यंत Gratuity मिळू शकते ?
वर्तमान नियमावरून एका कर्मचाऱ्याला २० लाख पेक्षा जास्त Gratuity मिळत नाही.भले त्या कर्मचाऱ्याचा पगार किती ही असो आणि त्याने कितीही वर्ष त्या कंपनीमध्ये नोकरी केलेली असो,त्याला २० लाखाच्या वरती Gratuity मिळत नाही.२९ मार्च २०१८ मधे ही २० लाख पर्यंतची लिमिट लागू केली होती,त्या अगोदर कर्मचाऱ्यांना फक्त १० लाखापर्यंत चा Gratuity मिळत होता
ग्रॅच्युईटी ॲक्ट कोणकोणत्या कंपनीवर लागू होतो ?
ज्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या १० पेक्षा जास्त असते असा सगळ्या कंपन्यांवर Gratuity ॲक्ट लागू होतो.एकदा जर एखादी कंपनी Gratuity चां ॲक्ट अंतर्गत रजिस्टर झाली तर ती परत Gratuity ॲक्ट मधून बाहेर पडू शकत नाही.
जर Gratuity ॲक्ट मध्ये रजिस्टर व्हायच्या आधी कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १० क्या वरती असेल आणि जर Gratuity ॲक्ट मध्ये रजिस्टर झाल्यानंतर त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १० पेक्षा कमी झाली तरीपण ती कंपनी Gratuity ॲक्ट मधून बाहेर पडू शकत नाही.त्या कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना Gratuity हा द्यावाच लागेल.