Gift for Raksha Bandhan : या रक्षाबंधन दिवाळीला बहिणीला द्या “या” महत्त्वाचे गिफ्ट, बहिणीचे जीवन होईल उज्वल!

Gift for Raksha Bandhan : मित्रांनो श्रावण महिना आल्यानंतर सणांची लगबग सुरू होऊन जाते. श्रावणातील दुसरा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणींचे पवित्र नाते साजरे करण्याचा दिवस. या दिवशी बहिण भावाला ओवाळते. भावाचे औक्षण करते आणि या बदल्यात भाऊ बहिणीला सुरक्षा भेट देतो.

आयुष्यभर तिची रक्षा करण्याचे वचन देखील देतो. हल्ली काळ बदललेला आहे, अशावेळी बहिणीला ओवाळी देताना जर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या बहिणी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही.

हल्लीप्रत्येक जण गुंतवणूक करण्यावर भर देत असतो, अशावेळी तुम्ही तुमच्या बहिणींसाठी विशिष्ट रक्कम गुंतवणूक करून एखादी एफ डी, एस आय पी, लाइफ इन्शुरन्स, हेल्थ पॉलिसी यासारखा विचार जर केला तर बहिणीच्या दुःखाच्या वेळी तुमचे हे अनोखे गिफ्ट कामात येऊ शकते. आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गिफ्ट बद्दल सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या बहिणी आयुष्यभर तुमच्या ऋणी राहू शकतात व तुमची कमतरता कधीच बहिणींना जाणवणार नाही…

Raksha Bandhan भाऊ बहिणीला सोन्याचे दागिने स्मार्टफोन एखादी गॅझेट पैसे मोबाईल फोन अशा अनेक वस्तू घेत असतात परंतु तुम्ही एखादी रक्कम बहिणीला देण्याचे काही गुंतवणुकीचे मार्ग बहिणीसाठी सहज असे मोकळे करू शकतात, त्यातील पहिला मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड.

म्युच्युअल फंड हल्ली सर्वांना माहिती आहे. या फंडामध्ये आपण एसआयपीच्या माध्यमातून ठराविक पैसा ठराविक काळासाठी गुंतवणूक करत असतो, अशावेळी आपल्याला शेअर मार्केट नुसार एखादा स्टॉक तुम्ही ठरवून विशिष्ट दीर्घमुदतीच्या कालावधीसाठी पैसे गुंतवणूक केल्याने तुम्हाला रिटर्न देखील चांगले मिळू शकतात.

हल्ली म्युच्युअल फंड मध्ये प्रत्येक जण पैसा गुंतवणूक करत असतो. एखाद्या फंडमध्ये पैसा गुंतवून तुम्ही तुमच्या बहिणीसाठी म्युच्युअल फंड खाते उघडून देऊ शकता.

जर तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एखादी एसआयपी उघडली तर तुमच्या बहिणीला आर्थिक सुरक्षितता प्राप्त होईल पण त्याचबरोबर भविष्यात आर्थिक अडचणी पासून देखील सुरक्षा मिळेल.

हेल्थ इन्शुरन्स (Gift for Raksha Bandhan)

हल्ली हेल्थ इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. कोविड नंतरच्या काळामध्ये अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवताना दिसून येत आहे, अशावेळी जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यानंतर व वैद्यकीय उपचार घेत असताना जर पैसे कमी पडले तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण राहणार नाही.

भावांनी आपल्या बहिणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट द्यायचे असेल तर हेल्थ इन्शुरन्स दिलेले नेहमी चांगले. तुमच्या बहिणींना आजारपणाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही तसेच त्यांचा पैसा देखील वाचेल.

डिजिटल सोने

हल्ली रक्षाबंधन दिवाळी यासारख्या सणांना भावंडे बहिणींना घेऊन देण्याकरिता भौतिक स्वरूपामध्ये उपलब्ध असलेले सोने गिफ्ट करत असतात परंतु तुम्ही डिजिटल सोने देखील तुमच्या बहिणींना गिफ्ट करू शकता, अशा प्रकारच्या डिजिटल सोन्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लॉकर ची आवश्यकता भासत नाही.

स्टॉक मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक

प्रत्येक जण आपला बचत केलेला पैसा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असतो. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी एखादा स्टॉक विकत घेऊन भविष्याची तरतूद करू शकता. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर ब्लू चीप सारख्या कंपनीमध्ये तुम्ही स्टॉक विकत घेऊ शकता, असे केल्याने भविष्यात तुम्हाला खूपच फायदा होऊ शकतो.

अशा प्रकारची गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या बहिणींसाठी एक सुरक्षितेचा मार्ग मोकळा करू शकता परंतु वर जे पर्याय सांगितले गेलेले आहेत त्यामध्ये रिस्क देखील तितकेच असते अशावेळी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार व तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार कोणत्याही प्रकारामध्ये गुंतवणूक करू शकता, यामुळे तुम्हाला देखील आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते.

Leave a Comment