Fine for Loan Closure : जर तुम्ही Loan लवकर फेडत असाल तरीदेखील तुम्हाला लागू शकते पेनल्टी जाणून घ्या या काही गोष्टी!

Fine for Loan Closure : हल्ली प्रत्येक व्यक्ती कर्जामध्ये डुबलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कसले ना कसले ईएमआय आपल्याला पाहायला मिळतात. घर, वाहन, कपडे, चैनीच्या वस्तू देखील आपण कर्जावरच घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे हप्ते दर महिन्याला फेडावे लागत आहे. कधी शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागते, कधी घरातील वस्तू विकत घेण्यासाठी. कर्जात च मनुष्याचे अर्ध जीवन व्यतित होत आहे.

कॅलेंडरच्या तारखेवरच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे. प्रत्येक कोणत्या ना कोणत्या तारखेला एखाद्या ईएमआय भरावा लागतो. जर ईएम आय वेळेवर भरला नाही तर बँक आपल्याला पेनल्टी चार्जेस लावत असते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे वेळेवर कर्ज देखील भरत असतात परंतु असे वेळेवर पैसे भरून देखील बँक त्यांना पेनल्टी लावत असते.

जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आजच्या या लेखांमधून आम्ही तुम्हाला पेनल्टी लागू नये याकरिता नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दल सांगणार आहोत.

Loan लवकर फेडण्याची करू नका घाई

आज प्रत्येकाकडे बचत केलेला पैसा असतोच असे नाही अशावेळी घर वाहन मुलांचे शिक्षण व स्वतःचे शिक्षण घरातील अनेक गोष्टी आरोग्य या सर्वांचे व्यवस्थित रित्या काळजी घेण्यासाठी आपल्याला कर्ज घेणे भाग पडतात यामुळे अनेक वर्ष आपण कर्ज भरत राहतो ज्या लोकांना पगार जास्त असतो अशा लोकांना देखील पगाराचा मोठा हिस्सा कर्जामध्ये रिटर्न भरावा लागतो.

आपल्यापैकी अनेकजण कर्ज लवकरच चुकते करता यावे याकरिता अनेक योजना आखत असतात. प्रत्येक जण वेळेवर देखील कर्ज भरतात, यामुळे ई एम आय ची जी पेनल्टी असते त्यातून आपल्याला सवलत मिळू शकेल परंतु अनेकदा कर्जाची परतफेड वेळेवर करत असताना देखील दंड आपल्याला भरावा लागतो. अनेकदा एखाद्या व्याजाच्या बरोबरीने देखील आपल्याला रक्कम पुन्हा भरावी लागते.

प्री पेमेंट दंड म्हणजे काय? (Fine for Loan Closure)

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर कर्ज विकत घेत असतो तेव्हा ते कर्ज किती कालावधीसाठी दिले जाणार आहे तसेच त्या कर्जावर किती ईएमआय भरावा लागणार आहे, हे निश्चित केलेले असते. त्यानुसार बँक आपल्याला कर्ज देते व त्यावरील हप्ता देखील सांगत असते. आपण घेतलेल्या रकमेवर बँक विशिष्ट स्वरूपामध्ये व्याज लावत असते.

जेव्हा आपण एखाद्या कर्जाची रक्कम लवकर परतफेड करतो, तेव्हा बँक देणाऱ्या किंवा कर्ज देणाऱ्या मंडळांकडून अपेक्षेप्रमाणे व्याज मिळत नाही. ते व्याज कव्हर करण्यासाठी अनेक बँक आपल्यावर प्री पेमेंट दंड आकारतात जेणेकरून त्यांना कर्जामुळे चांगला परतावा मिळू शकेल.

नियम आधी वाचा

जेव्हा आपण एखाद्या संस्थेकडून Loan घेतो तेव्हा त्यांच्या नियमावली मध्ये काही नियम दिलेले असतात व काही अटी देखील सांगितलेल्या असतात. त्याच बॉण्डमध्ये आपल्याला दंड देखील सांगितलेला असतो.

जर आपण वेळेच्या आधी कर्ज बंद केले तर आपल्याला विशिष्ट टक्केवारीच्या आधारावर शुल्क आकारले जातात व तुम्हाला दंड भरावा लागतो, म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्ही एखादी कर्ज घेणार असाल तर अशावेळी सर्व अटी व शर्ती वाचा आणि त्यानंतरच कर्जावर आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांवर सही करा.

कर्जाच्या अटींमध्ये या दंडाचा उल्लेख आहे. काही सावकार निश्चित दंड आकारतात तर काही टक्केवारीच्या आधारावर शुल्क आकारतात. म्हणून, कर्जाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, त्याच्या अटी व शर्ती वाचण्याची खात्री करा. या कर्जाची परतफेड करताना काय होईल किंवा थोडा विलंब झाल्यास किती दंड आकारला जाईल.

पेनल्टी प्री पेमेंट कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायची?

आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा त्या कर्जाच्या नियमावली मध्ये प्री पेमेंट दंडाचा उल्लेख देखील अनेकदा केला जात नाही, अशावेळी तुम्हाला कर्ज लवकर जरी फेडले तरी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नसते परंतु जर कर्ज अटींमध्ये दंडाचा उल्लेख केला असेल तर तुम्हाला ठराविक वर्ष तरी तुमचे कर्ज चुकवावे लागत नाही.

अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. प्री पेमेंट पेनल्टी असल्यास कर्जाची आगाउ रक्कम तुम्ही लवकर फेडला तर दंड लागतो. जर आपण व्याजाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास व्याजाबद्दल तुमची चांगली बचत तर होईल परंतु कर्ज लवकर फेडण्याचे नादामध्ये तुम्हाला एक्सट्रा पेमेंट देखील करावे लागू शकते आणि म्हणूनच ठराविक वर्ष कर्ज न फेडता तुम्ही विशिष्ट वर्षानंतर तुमचे लोन क्लोज करू शकता.

Leave a Comment