Financial Planning Tips For Student: मित्रांनो पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. पैसे जर तुमच्याकडे असेल तर अनेक गोष्टी पासून संरक्षण मिळते मग ते मानसिक शारीरिक किंवा आर्थिक संकटका होईना. या सर्वांवर एक उपाय म्हणजे पैसा.
या पैशाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल सगळीकडे पैसा लागतो. कुठे बाहेर जायचं असेल? कुठे काही खायचे असेल? शिक्षण घेतले असेल ? आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर सगळीकडे पैसा हा महत्त्वाचा असतो. आजकाल शिक्षण घेणेदेखील सोपे नाहीये.
शाळेमध्ये फी शाळेसाठी लागणारा खर्च वह्या पुस्तक यांच्याकरिता भरपूर प्रमाणावर पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आतापासूनच पैशाचे योग्य नियोजन करायला शिका नाही तर भविष्यात आर्थिक अडचण तुम्हाला सतावू शकते. आजच्या लेखांमध्ये विद्यार्थी वर्गाला उपयुक्त अशी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
त्यामुळे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर भविष्यात पैशाची सोय कशी करायची जर तुम्ही शिक्षण घेता घेता कामदेखील करत असाल तर आमच्या कामातून पैसे मिळवत असाल तर भविष्यात पैसे कशाप्रकारे गुंतवणूक करायचे याबद्दल तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात माहिती सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
Financial Planning Tips For Student
जर तुम्ही विद्यार्थी जीवनामध्येच पैश्याची गुंतवणूक योग्य प्रकारे केले तर भविष्यात तुम्हाला खूप सारे लाभ मिळू शकतात आणि यामुळे आर्थिक नियोजन देखील तुमचे चांगले राहील. भविष्यातील अनेक तरतुदी तुम्ही चांगल्या प्रकारे हँडल करू शकता.
कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आपण आपल्या मित्रांसोबत अनेकदा बाहेर जात असतो. पैसा विनाकारण खर्च करत असतो तसेच महिन्याला आई वडील देखील तुम्हाला काही पॉकेट मनी देत असतात, अशावेळी फालतू खर्च न करता तुम्ही या सर्वांमधून देखील ठराविक रक्कम बाजूला काढून पैसे गुंतवणूक करू शकता.
जर कामाला पैसे नसतील तर अशावेळी आपण आपल्या मित्रां मैत्रिणींना देखील पैसे उधार घेत असतो परंतु असे वारंवार करणे हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच महाविद्यालयीन जीवन जगत असताना तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
तुमचा बजेट आधी ठरवा
जर तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून किती पैसे मिळतात व तुम्ही जर कामाला जात असाल तर तुम्हाला तुमचा पगार किती महिन्याला मिळतो. याचे एक फिगर बाजूला काढून ठेवा.
तसेच महिन्याभराचे खर्च व उरलेले रक्कम तुम्ही कोणत्या कारणासाठी वापरत आहात याची एक लिस्ट तयार करा म्हणजेच तुमचे बजेट काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल उरलेली रक्कम तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये किंवा एसआयपी मध्ये सहजच अडकवू शकता.
खर्चावर मर्यादा आणा
तुमच्या बजेटनुसार खर्चाचे नियोजन करणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे यामुळे पैसा कसा हाताळायचा याची शिकवण तुम्हाला मिळणार आहे. बहुतेक वेळा पैसा कसा वापरावा? कुठे वापरावा याचे ज्ञान विद्यार्थ्यांना नसते आणि विनाकारण खर्च मोठ्या प्रमाणात होत असतो अशावेळी तुमच्या बचत वर अति संकट व ती भार निर्माण होऊ शकतो. अशावेळी तुमच्या खर्चाची यादी तुम्हाला विनाकारण पैसे खर्च करण्यापासून बचावू शकते.
अतिरिक्त खर्च टाळा
कॉलेजमध्ये असताना अतिरिक्त खर्च यांच्यापासून दूर राहा तसेच जर वारंवार तुम्ही तुमच्या बजेटच्या बाहेर जात असाल तर यासाठी आपल्याला काय करता येईल याचे नियोजन देखील करायला हवे.
अनावश्यक खर्च थांबवून तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा. पेमेंटसाठी स्वयंचलित बिल पेमेंट मोड करा तसेच क्रेडिट कार्ड चालू असताना वापर करू नका.
बचत अन् योग्य गुंतवणूक करा.
विद्यार्थी असतानाच तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून जे पैसे मिळतात, ते पैसे सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करा व त्याचबरोबर कमीत कमी खर्च करण्याची सवय लावा यामुळे भविष्यात तुम्हाला गुंतवणूक करण्याची योग्य संधी मिळाल्यास पैसे गुंतवणूक करा.
म्युचल फंड आरडी एसआयपी पोस्टाचे फंड अशा विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करा. शिक्षण घेत असताना शक्यतो पार्ट टाइम जॉब देखील करा यामुळे तुम्हाला शिक्षणामध्ये मदत होईल.
सवलतीचा योग्य वापर
विद्यार्थ्यांकरिता बाजारामध्ये अनेक सवलती उपलब्ध असतात जसे की या सवलतीच्या माध्यमातून तुम्ही पैसे देखील वाचू शकता. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी प्रवास करण्यास सवलती दिली जाते डायनिंग अकाउंट, पुस्तक सवलत तसेच अनेक योजना या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेले असतात.
या सर्व शासकीय योजना व निमशासकीय योजनेचा उपयोग करून तुम्ही तुमचे भवितव्य उज्वल करू शकता तसेच पैशांचा भार देखील कमी करू शकता तुम्ही विद्यार्थी असाल तर शिक्षण देखील कमी पैशांमध्ये करू शकता. शिक्षणासाठी योग्य प्रकारचे वेगवेगळे एज्युकेशन लोन उपलब्ध असतात, याचा उपयोग करून तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता.