Financial Freedom : आर्थिक संकटातून मोकळे होण्याचे हे आहेत महत्त्वाचे मार्ग !

Financial Freedom : मित्रांनो हल्ली महागाई वाढलेली आहे. या महागाईच्या काळामध्ये असे अनेक खर्च आहेत, ज्यांची कल्पना देखील करणे मुश्कील आहे. दिवसेंदिवस काही ना काही अडचणी वाढत आहे, अशा वेळी महिन्याला असलेला पगार काही पुरत नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल तर महिन्यावर तारे वरची कसरत करावी लागते.

जर एखादा व्यवसाय करत असाल तर पैसा हा काही ना काही कारणाने येत जात असतो, अशावेळी आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे ठरते. जर तुम्ही आर्थिक नियोजन केले नाही तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये आर्थिक गुलामगिरी निर्माण होऊ शकते.

जर या आर्थिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टींचे नियोजन करणे गरजेचे आहे. आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लवकरच आर्थिक गुलामगिरीतून मुक्त व्हाल.

खर्च लिहून ठेवा

तुम्हाला पगार किती आहे तसेच तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायातून किती पैसा तुमच्या घरामध्ये येतो? महिन्याला खर्च किती आहेत ? छोटे खर्च मोठे खर्च यांची नोंद करून ठेवा.

या सर्व गोष्टीमुळे पैसा घराच्या बाहेर किती जाणार आहे याची कल्पना तुम्हाला येईल आणि या विशिष्ट आकड्यामुळेच तुम्हाला तुमचा पैसा किती बाजूला ठेवायचा आहे व उरलेल्या पैशातून घर खर्च कसा चालवायचा आहे याची माहिती मिळू शकते.

कर्जाचा हप्ता व्यवस्थित भरा

हल्ली प्रत्येकाला कर्ज घ्यावे लागते. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाशिवाय आपल्याकडे पर्याय नाही म्हणूनच आर्थिक नियोजन करताना तुमच्या डोक्यावर कोणकोणते कर्ज आहे याची नोंद करून ठेवा आणि सर्वांचे हप्ते त्या त्या तारखेला भरा यामुळे तुम्हाला अतिरिक्त पैसे बँकेमध्ये भरावी लागणार नाही. तुमच्या प्लॅनिंगवर कोणत्याही प्रकारचा अधिक बोजा निर्माण होणार नाही.

उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा

हल्ली कितीही पैसा कमावला तर तो कमीच पडतो अशावेळी छोट्या छोट्या मार्गातून तुमचा पैसा तुमच्याकडे कसा येऊ शकतो. उत्पन्नाचे स्त्रोत कसे निर्माण होऊ शकतात याचा अधिक विचार करा.

कर्ज दूर करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पैसा उभा करू शकता हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. हल्ली एका नोकरीवर किंवा एका व्यवसायावर भागत नाही, अशावेळी दुय्यम स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे अशा काही क्रियांच्या माध्यमातून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता.

शेअर मार्केट म्युच्युअल फंड मध्ये पैसा गुंतवणूक करा

जर तुमच्याकडे महिन्याला थोडाफार पैसा जमा होत असेल तर त्याच्यातील काही पैसा म्हणजे पाचशे रुपये पासून ते पाच हजारापर्यंत तुम्ही एखादी एस आय पी, म्युच्युअल फंड व एफडी मध्ये पैसा जमा करू शकता, असे केल्याने पाच ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक केलेला पैसा भविष्यात तुम्हाला अधिक व्याजदर परतावा देईल जेणेकरून भविष्यात एखादी कर्ज तुमचे दूर होऊ शकते.

मुलांचे शिक्षण लग्न यांकरिता शासकीय योजनांचा उपयोग.

हल्ली शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच मुलींच्या शिक्षणासाठी लग्नासाठी वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची आर्थिक गुलामगिरी दूर करू शकतात.

मुलींसाठी शासनाने समृद्धी कन्या योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या 21व्या वर्षापर्यंत तुम्ही रुपये पाचशेपासून गुंतवणूक करू शकता, असे केल्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी व लग्न करिता तुम्हाला वेगळा पैसा जमवावा लागणार नाही.

वरील ठराविक मुद्द्यांचा विचार करून तुम्ही तुमच्या जीवनातील आर्थिक गुलामगिरी दूर करू शकता. कर्जाचे डोंगर लवकरच दूर करू शकता आणि भविष्यात तुम्हाला कोणतेही कर्ज घेण्याची वेळ देखील येणार नाही म्हणूनच तुमच्याजवळ आलेला पैसा उधळण्यापेक्षा जास्तीत जास्त त्याचा चांगला वापर कसा करता येईल याचा विचार करा.

Leave a Comment