FD Interest : प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं. श्रीमंती अनुभवण्यासाठी प्रत्येक जण मेहनत देखील करत असतो परंतु श्रीमंत होणे हे काही एका रात्रीत शक्य होत नाही त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणे गरजेचे आहे. आपण कमावलेला पैसा बाजूला सारून बचत करणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक जण मेहनत करतात परंतु पैसा साठवून ठेवत नाही आणि म्हणूनच अडी – अडचणीला देखील मोठ्या प्रमाणावर संकटांना सामोरे जावे लागते.
मेहनतीने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत पैसा जमा करतात परंतु हल्ली बँक देखील सुरक्षित नाहीत. बँकेमधील पैसा डुबण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच अशा वेळी जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर तुमचा पैसा सुरक्षित राहू शकतो. तुम्ही सरकारी बँकेमध्ये पैसा गुंतवणूक करू शकतात. खाजगी बँकेमध्ये देखील पैसा गुंतवणूक करू शकतात परंतु पैसा किती गुंतवायचा हे आपल्या हातात आहेत.
पैसा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. या बातमीच्या माध्यमातून तुमचा पैसा व त्या पैशावर मिळणारा व्याजदर वाढणार आहे आणि म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये अधिक वाढ देखील तुम्हाला दिसून येईल.
बँकेतील मुदत ठेवीवर सध्या व्याजदर चांगलेच वाढलेले आहेत त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीसीआय, एचडीएफसी सारख्या देशातील अग्रगण्य असलेल्या बँक जेष्ठ नागरिकांना देखील अतिरिक्त व्याजदर देत आहेत त्याचबरोबर देशांमध्ये काही छोट्या म्हणजेच स्मॉल फायनान्स बँकही आता आपल्याला अधिक व्याजदर देताना दिसून येत आहे. नुकतेच 21 ऑगस्ट रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला आणि याच दिवशी जेष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीवर अधिक व्याजदर देण्याचे देखील ठरवले गेलेले आहे.
आता आपण अशा काही बँक बद्दल जाणून घेणार आहोत ज्या बँकेमध्ये तुमच्या मुदत ठेवीवर जास्त व्याजदर दिला जाणार आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
FD Interest इक्विटास स्मॉल फायनान्स ही बँक आपल्या ग्राहकांना देखील उत्तम व्याजदर देत आहे. जर तुमचे खाते या बँकेमध्ये असेल आणि तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर ही बँक तुम्हाला 444 दिवसांच्या मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देईल. हे व्याजदर गेल्या आठवड्यापासूनच सुरू झालेले आहेत म्हणूनच भविष्यात तुम्हाला आता तुम्ही जे पैसे बचत केलेले आहेत त्याच्यावर अधिक व्याजदर मिळतील.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमी तत्पर असते. या बँकेच्या अनेक जाहिराती देखील आपण माध्यमांवर पाहिलेल्या असतील. ही बँक जेष्ठ नागरिकांनी जर 500 दिवसाच्या वर मुदत ठेवली असेल तर त्यावर 9 टक्के व्याजदर पुरवत आहे त्याचबरोबर 750 दिवसांच्या मुदत ठेवीवर 9.43% तसेच हे व्याजदर गेल्या महिन्याच्या 26 जुलैपासूनच ज्येष्ठ नागरिकांना लागू झाले आहेत.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर चांगलाच व्याजदर पूरवीत आहे. जर या बँकेतील जेष्ठ नागरिकांनी 1095 दिवसांच्या ठेवीवर पैसे ठेवले असतील तर त्या पैशांवर बँक 9 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 15 ऑगस्ट पासून लागू झाले आहे.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 555 दिवसाच्या मुदत ठेवीवर 9.25 तसेच 1111 दिवसाच्या मुदत ठेवीवर 9.25 व्याजदर पूरवत आहे. जर तुमचे देखील खाते या बँकेमध्ये असेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असेल तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही कारण की तुमच्या बचत केलेल्या पैशांवर आता चांगलाच व्याजदर मिळणार आहे. तुम्ही दर महिन्याला अधिकच कमाई करू शकता.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
FD Interest सूर्योदय स्मॉल फायनान्स ही बँक ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नेहमी विविध योजना आणत असते यंदाही ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँकेने 15 महिने ते दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर नऊ टक्के व्याज आणि दोन ते तीन वर्षाच्या मुदत ठेवीवर 9.10% व्याज देत आहे हे व्याजदर करण्यात आले आहे.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना दोन ते तीन वर्षांपैकी कमी कालावधीच्या गुंतवणुकीवर नऊ टक्के व्याज देत आहे, यामुळे जर तुम्ही देखील कमी वर्षासाठी गुंतवणूक केलेली असेल तरीही तुम्हाला अधिक व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. हे व्याजदर बँकेने 14 एप्रिल पासून लागू केलेले आहेत. या बँकेमध्ये तुम्ही देखील पैसा गुंतवणूक करून तुमच्या मुदत ठेवीवर अधिक व्याजदर मिळू शकता.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)
आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच मुदत ठेवीवर अधिक व्याजदर मिळावे व ग्राहकांनी अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या एफ डी, एस आय पी मध्ये गुंतवणूक करावी याकरिता युनिटी स्मॉल फायनान्स बँक नेहमी प्रयत्नशील असते. ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 9.25 टक्के ते 9.50% व्याज देत आहे. हे व्याजदर 11 ऑगस्ट पासून लागू करण्यात आले आहेत.
जर भविष्यात तुम्हाला देखील पैसा गुंतवणूक करायचा असेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे एफ डी मध्ये पैसा गुंतवणूक करायचा असेल तर वरील बँकेमध्ये पैसा आवश्यक गुंतवणूक करा यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न्स देखील मिळतील.