Disable pan card : आपल्या सर्वांना पॅनकार्ड माहिती असेल. पॅन कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. अनेक शासकीय योजना व दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार करत असताना आपल्याला पॅनकार्ड ची आवश्यकता भासत असते. जर पॅन कार्ड बंद पडले तर काय होऊ शकते?
असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये आला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर तुमचा पगार तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो का? हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर त्याचे ही उत्तर आपण तज्ञांच्या मते जाणून घेणार आहोत म्हणूनच गेल्या काही महिन्यापूर्वी आपल्याला आपले पॅन कार्ड अपडेट करण्याचा सल्लादेखील दिला गेला होता. पॅन कार्ड हे आपल्या आयकर संबंधित महत्त्वाच्या बाबींशी निगडित असणारे कागदपत्र मानले जाते.
जाणून घ्या तज्ञांचे मत
Money Mantra गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा, अशा वारंवार सूचना सरकारद्वारे देण्यात आल्या होत्या परंतु अनेकांनी पॅन कार्ड हे आधार कार्ड शी लिंक केले नाही अशावेळी अनेकांचे पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजे बंद देखील झाले होते. जर तुमच्या बाबतीत असे काही भविष्यात घडले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यवहार करताना ते पॅन कार्ड वापरता येणार नाही.
जसे की तुम्हाला बँक खाते उघडायचं असेल, एफ डी मध्ये पैसे गुंतवणूक करायचे असेल, अनेक गोष्टी तुम्हाला करता येणार नाही मग आपला पगार खात्यामध्ये जमा होईल का? की तोही जमा होणार नाही? हे देखील जाणून घेणे तितकच गरजेचे आहे. आज याच प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
हा प्रश्न तज्ञ मंडळीला विचारले असता तज्ञ मंडळींच्या मते जर तुमचे पॅन कार्ड बंद पडले असेल तर अशावेळी पगार जमा होण्यासाठी वेळ लागू शकतो तसेच तुम्हाला बँकेचे व्यवहार देखील करताना अडचणी निर्माण होऊ शकतात कारण की हल्ली पैसे काढताना देखील पॅन कार्ड मागितले जाते आणि जर अशावेळी पॅन कार्ड नसेल तर बँकेमधून पैसे काढणे मुश्किल होऊ शकते.
जर पगारांकडे पॅन कार्ड उपलब्ध नसेल तर पगारावर असलेला व लागलेला कर या सर्वांचा लाभ द्यायला घेता येणार नाही तसेच भविष्यात तुम्हाला फॉर्म शिक्षण देखील मिळणार नाही असा देखील सल्ला तज्ञ मंडळींनी दिलेला आहे जर तुमच्याकडे फॉर्म सिक्सटीन नसेल तर तुम्हाला भविष्यात आयटी रिटर्न फाईल भरायला अडचण येऊ शकते परिणामी तुम्हाला अधिक तर टॅक्स शासनाला द्यावा लागेल.
लवकर करा पॅन कार्ड अपडेट (disable pan card)
जर तुमचे पॅन कार्ड काही कारणास्तव बंद पडले असेल तर तुम्हाला ते पुन्हा सुरू करावे लागेल याकरिता तुम्हाला हजार रुपये दंड देखील भरावे लागणार आहे. हा दंड भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड पुढील 30 दिवसांमध्ये पुन्हा सक्रिय होईल म्हणूनच जर तुम्ही देखील आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट केले नसतील तर अवश्य करून घ्या.
अन्यथा सरकार तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड सारखी कागदपत्र जप्त करू शकते आणि भविष्यात तुम्हाला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. दैनंदिन जीवनामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे कामकाज करता येणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी म्हणूनच भविष्यात अडचणीचा सामना होऊ नये असं वाटत असेल तर आपले पॅन कार्ड संबंधित माहिती आताच अपडेट करा.