Cheque tips : बँकेत गेल्यानंतर , पैसे काढताना किंवा चेक भरताना किंवा पैसे टाकण्याची स्लीप भरताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात.भारत सरकारने जेव्हापासून भारतीयांसाठी UPI (युपियाई) ही सेवा चालू केली आहे.
तेव्हापासून जास्त करून लोक आपल्या रोजच्या व्यवहारासाठी ऑनलाइन बँकिंग चा वापर करतात .आजकाल तर सर्वत्र लोक ऑनलाइन कॅश चा वापर करतात.ऑनलाइन बँकिंग चे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे लोक जास्तकरून ऑफलाईन बँकिंग पेक्षा ऑनलाइन बँकिंग ला प्राधान्य देत आहेत.
अशा या वाढत्या ऑनलाइन बँकिंग च्या वापरा वेळी देखील काही लोक बँकेत जाऊन पैसे काढणे,पैसे भरणे या गोष्टींना प्राधान्य देतात.ते ऑनलाइन पैसे काढणे – भरणे,किंवा दुसऱ्याला सेंड करणे यापेक्षा बँकेत जाऊन पैसे काढणे किंवा पैसे भरणे किंवा पैसे दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे सेंड करणे, इत्यादी कामे बँकेत जाऊन करणे सोयीस्कर समजतात. त्यांना ऑनलाइन बँकिंग पेक्षा ऑफलाईन बँकिंग सोयीस्कर वाटते.
अशाच वेळी जे लोक बँकेत जाऊन पैसे काढतात किंवा पैसे भरतात, त्यांनी चेक भरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे .नाहीतर आपल्या बँक खात्यातील पैसे लंपास देखील होऊ शकतात.
पैसे होतील गायब
जेव्हा आपण बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी जातो, तेव्हा स्लीप किंवा चेक भरताना आपण आपल्या स्वताकडचा पेन वापरला पाहिजे.आपण जर दुसऱ्याचा पेन वापरला तर काही वेळा आपल्या बँकेतील पैसे गायब देखील होऊ शकतात,जाणून घ्या कसे ते ;
भारतामध्ये असंख्य सरकारी आणि खाजगी बँका आहेत आणि त्या असंख्य बँका मध्ये असंख्य माणसांनी त्यांची खाती उघडली आहेत. प्रत्येक बँकेमध्ये दररोज लाखोंचा व्यवहार होत असतो. शहरामध्ये स्थित असणाऱ्या बँकेतच न्हवे तर ग्रामीण भागात स्थित असणाऱ्या बँकेत देखील दिवसाला लाखोंचा व्यवहार होतो.
भारत सरकारच्या जणधन योजनेमुळे खेडे गावातील माणसे आणि आदिवासी पाड्यातील लोकांनी देखील बँकेची खाती उघडली आहेत आणि ते बँकेत जाऊन नियमित व्यवहार करत असतात. बँकेत खाते उघडनाऱ्यांची संख्या कोटी मधे आहे आणि हा बँकेत खाते उघडण्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
बँकेत दररोज महत्त्वाची कामे केली जातात.बँकेत आपण करत असणारे व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
ऑनलाइन बँकिंग मधे दिवसेंदिवस फ्रौड च्या घटना आपण ऐकत आहोत.अलीकडे या ऑनलाइन बँकिंग च्या फ्रौड च्या घटना वाढतच चालल्या आहे. फ्रॉड करण्याच्या पर्याया मध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ऑनलाइन बँकिंग फ्रौड सोबतच ऑफलाईन बंकिंग फ्रौड चे देखील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आपण बँकेत गेल्यानंतर योग्य ती दक्षता घेतली पाहिजे.
ऑफलाईन बँकेत व्यवहार करताना खालील चुका तुम्हाला महागात पडतील :
१) Cheque tips पेन – बँकेत व्यवहार करताना आपण आपल्याकडचा च पेन वापरला पाहिजे.आपण जर दुसऱ्या व्यक्ति कडून पेन घेऊन आपला चेक किंवा पैसे काढन्याची स्लीप , भरण्याची स्लीप भरत असू ,तर आपली फसवणूक होऊ शकते.आपण बँकेत जेव्हा ही पैसे काढण्यासाठी चेक भरतो ,तेव्हा तो चेक आपण आपल्या पेन नेच भरला पाहिजे.कारण काही पेन असे असतात ,ज्याने काही क्षणांत लिहिलेले अक्षर खोडले जाऊ शकते किंवा ते बदलले जाऊ शकते.
असेच जर आपण चेक लिहिताना दुसऱ्या कडून पेन घेतला तर आणि तो पेन वर सांगितल्या प्रमाणे असला तर आपली फसवणूक देखील होऊ शकते आणि आपले नुकसान होऊ शकते.अशा पेन द्वारे लिहिलेली रक्कम बदलता येते , त्यामुळे ही फ्रॉड करणारी मंडळी आपण लिहिलेल्या रक्कमेमध्ये बदल करून आपली चेक वरची सही न बदलता आपली फसवणूक करू शकतात. त्यामुळे आपण चेक किंवा स्लीप लिहिताना आपल्याकडच्या पेन चा वापर केला पाहिजे.
२) Cheque tips जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला धनादेश द्यायचा असेल तर आपण त्या व्यक्तीचा च पेन घेऊन चेक भरला पाहिजे.जर आपल्याला चेक कॅन्सल करायचा असेल तर आपण चेक च्या बाजूला तीन रेषा मारून त्यावरती कॅन्सल चेक असे लिहीले पाहिजे.हे सर्व करताना आपण आपल्याकडचा च पेन वापरला पाहिजे.दुसऱ्या कडचा पेन आपण घेतला नाही पाहिजे, जेणेकरून चुकीची व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकली नाही पाहिजे.