Business Idea : सध्या बेरोजगारीचे प्रमाण इतके वाढले आहे की कितीही शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनासारखा जॉब मिळत नाही. नोकरीसाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेकदा इंटरव्यू देऊन देखील सिलेक्शन होत नाही.
अशावेळी अनेक तरुणांच्या मनामध्ये निराशा निर्माण होते. तरुण वर्ग चुकीच्या मार्गाकडे वळतो परंतु तुम्हाला देखील नोकरी मिळत नसेल तर चुकीचे पाऊल उचलू नका. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका तरुणाबद्दल सांगणार आहोत.
ज्या तरुणांनी एमबीएची डिग्री पूर्ण केल्यानंतरही मनासारखा जॉब मिळत नव्हता अशा वेळी या तरुणाने हिम्मत हरली नाही व एक नवीन व्यवसाय उभारला. या व्यवसायाच्या मदतीने आज हा तरुण दिवसाला नऊ हजार पेक्षा जास्त अंडी विकत आहेत आणि दिवसाला हजारो रुपये कमवून त्याचा महिन्याचा गल्ला लाखोच्या वर जातो आहे चला तर मग जाणून घेऊया या तरुणाची आगळीवेगळी कहाणी..
खेडेगावातील मुलगा
सिंधुदुर्ग गावातील कणकवली तालुक्यामधील एका छोट्याशा खेडेगावात राहणारा हा तरुण चिंचवली गावात राहणारा आहे. या तरुणाने एमबीए फायनान्स पूर्ण केले. या तरुणाचे नाव मंदार पेडणेकर असून या तरुणाने आपल्या मूळ गावीच एक पोल्ट्री फार्म सुरू केला यामागे देखील एक कल्पना त्याच्या मनामध्ये लपली होती. एमबीए फायनान्स करून देखील मनासारखा पगार त्याला मिळत नव्हता अशा वेळी त्याने व्यवसायाकडे वळणे महत्त्वाचे मानले.
Business idea मंदार ने पोल्ट्री फार्म दीड एकर जमिनीवर सुरू केली आणि हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला. सध्या हा पोल्ट्री फार्म यशस्वीपणे जोरात चालू आहे या व्यवसायातून मंदारला भरघोस कमाई देखील मिळत आहे.
कोविड काळामध्ये प्रत्येक जण नोकरीमध्ये चढउतार सहन करत होता. मंदारला देखील या लॉकडाऊनची झळ बसली. जॉब सिक्युरिटी अजिबात नव्हती. या सर्व प्रसंगातूनच मंदारला कोंबडी लेहर पोल्ट्री फार्म निर्माण करण्याची कल्पना सुचली या व्यवसायामध्ये रिक्स देखील कमी आहे आणि म्हणूनच मंदारने या व्यवसायात उतरण्याचे ठरवले.
सध्या या पोल्ट्री फार्ममध्ये दहा हजार पक्षी आहेत. या कोंबड्यांपासून 9000 अंडी दिवसाला मिळतात. मंदारला या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा देखील होतो. महिन्याच्या शेवटी एक लाख वीस हजार रुपये मंदार या पोल्ट्री फार्म मधून कमवतो.
एवढेच नाही तर मंदारच्या हाताखाली सहा कामगार देखील काम करतात. या कामगारांना दर महिन्याला 30 हजार रुपये पगार आहे. एकंदरीत लाखो रुपयाची उलाढाल मंदार महिन्याला करतो असे म्हणायला हरकत नाही.
वडिलांची पुण्याई आली कामी
हा Business idea सुरू करण्यासाठी मंदारला 60 ते 65 लाख रुपये खर्च आलेला असला तरी त्यांनी या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक करणे महत्त्वाचे मानले. मंदारचे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कार्यरत होते. मार्चमध्ये मंदारच्या वडिलांची सेवानिवृत्ती झाली आणि सेवानिवृत्तीमध्ये मिळालेले पैसे वडिलांनी मंदारला या व्यवसायासाठी दिले.
वडिलांच्या मदतीने मंदारने हा व्यवसाय अगदी जोमाने सुरू केला. आज या व्यवसायामध्ये मंदार अगदी यशस्वीरित्या पायरो होऊन उभा आहे मंदारचा हा प्रकल्प अनेक तरुणांसाठी आदर्श आणि मार्गदर्शन देखील ठरत आहे. जे लोक आजही नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांनी व्यवसायाकडे वळावे असा सल्ला देखील मंदार तरुणांना देतो आहे.
घरीच बनवतो खाद्य पदार्थ
या पोल्ट्री फार्ममध्ये पक्षांसाठी लागणारे खाद्यपदार्थ मंदार घरीच तयार करतो. यामध्ये मका सोयाबीन पेंड स्टोन ग्रेड तसेच मेडिसिन मध्ये विविध घटक मिसळलेले असतात. हे पदार्थ बनवण्यासाठी कच्चे खाद्यपदार्थ बाहेरून मागवले जातात. कोंबड्यांना दिवसाला अनेक टन खाद्यपदार्थ लागतात. एक कोंबडी दिवसाला शंभर ग्रॅम खाद्य खाते, असे देखील मंदारने सांगितले.
एकंदरीत मंदारचे कल्पना आणि आई-वडिलांची पुण्याई यामुळे आज मंदार यशाच्या शिखरावर पोहोचलेला आहे मंदार ने केलेली ही सुरुवात अनेक बेरोजगारांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारी आहे.